Home » Top Story » Saif Ali Khan Bullet Raja Will Release In September

6 सप्टेंबरला येणार ‘बुलेट राजा’

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 10:22 AM IST

आजकाल रिलीज डेटवरून चित्रपट निर्मात्यांत जणू स्पर्धाच लागली आहे. आपल्या चित्रपटावेळी इतरांचा चित्रपट रिलीज होऊ नये हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच ‘बुलेट राजा’ 6 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओने याची विशेष काळजी घेतली आहे. तिग्मांशू धूलिया दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल आणि इरफान आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमध्ये करण्यात आले आहे. हा एक अँक्शन चित्रपट असणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, ‘बुलेट राजा’मधील भूमिकेसारखी भूमिका सैफने आतापर्यंत साकारलेली नाही. मात्र, प्रेक्षकांना सैफचे हे रूप आवडते की नाही ते पाहावे लागेल.

Email Print
0
Comment