Home » Top Story » Saif Ali Khan To Launch Kareena’S Cousin

करीनाच्या आतेभावाला सैफ करणार बॉलिवूडमध्ये लाँच

भास्कर नेटवर्क | Feb 18, 2013, 10:01 AM IST
 • करीनाच्या आतेभावाला सैफ करणार बॉलिवूडमध्ये लाँच

  अभिनेता सैफ अली खान त्याच्या मेव्हण्याला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते करीनाचा आतेभाऊ अरमानबद्दल. अरमान करीनाचे वडील रणधीर कपूर यांची बहीण रीमाचा मुलगा आहे.
  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफने अरमानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे सांगितले.

  सैफने सांगितले की, ''माझी कंपनी एल्युमिनेटी फिल्म्सद्वारे अरमान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ही एक लव्ह स्टोरी असेल. हा सिनेमा इम्तियाज अलीचा भाऊ आरिफ दिग्दर्शित करणार आहे. इम्तियाज क्रिएटिवली या प्रोजेक्टकडे लक्ष देईल. या सिनेमाबद्दल माझे बिझनेस पार्टनर दिनेश विजन अशी माहिती देऊ शकतात. त्यांना या प्रोजेक्टविषयी माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. सध्या माझे लक्ष आगामी 'गो गोवा गॉन' या सिनेमाकडे आहे.''
  या सिनेमात अरमानच्या अपोझिट कोणती अभिनेत्री असणार, हे सांगायला मात्र सैफने नकार दिला.

 • करीनाच्या आतेभावाला सैफ करणार बॉलिवूडमध्ये लाँच

  अरमान करीना कपूरची आत्या रीमाचा मुलगा आहे.

 • करीनाच्या आतेभावाला सैफ करणार बॉलिवूडमध्ये लाँच

  सैफ अरमानला बॉलिवूडमध्ये लाँच करत असल्यामुळे बेगम करीना खूपच खुश आहे.

Email Print
0
Comment