Home » Top Story » Sanjay Dutt's Secret Visit To Nanded's Divine Shrine !

हुजूर साहेबांच्या दर्ग्यात पोहोचला संजय दत्त

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 11:56 AM IST

अभिनेता संजय दत्त सध्या देवाचा धावा करतोय. त्याचे कारणही तसेच आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निर्णयाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे संजय दत्तच्या चेह-यावर काळजी स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणातून सुटका व्हावी यासाठी तो देवाचा धावा करतोय.

अलीकडेच संजय दत्त नांदेडला जाऊन आला. हुजूर साहेब दर्ग्यात डोकं टेकायला संजय नांदेडला गेला होता. यावेळी उद्योजक वाहिद अली खानही संजयसोबत होता. प्रायवेट जेटने संजय नांदेडला गेला होता.

नांदेडच्या हुजूर साहेब या दर्ग्यात दर्शन घेतल्यामुळे इच्छापूर्ती होते, अशी या दर्ग्याची ख्याती आहे. म्हणूनच संजयने येथे येऊन दर्शन घेतले असावे.

Email Print
0
Comment