Home » Top Story » Shah Rukh And Me Were Never So Close Says Salman Khan

'बॉलिवूडमध्ये गटबाजी नाही'

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 15:59PM IST

दबंग स्टार सलमान खान आणि शाहरुख खानमधील ‘शत्रुत्व’ सर्वश्रूत असतानाच सलमानने बॉलिवूडमध्ये कसलीही गटबाजी नसल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूडमध्ये गटबाजी नाही. माझे स्वत:च्या कामावर लक्ष असते. कुणाच्या जीवनशैलीचे अनुकरण करत नाही. मला कुणाला भेटावे किंवा बोलावे वाटत असेल तर मी त्यांना भेटतो. कोण कोणाचा मित्र आहे, याच्याशी मला देणेघेणे नाही, असे सलमानने म्हटले आहे. शाहरुख आणि दबंग स्टार सलमान यांच्यात काही वर्षांपासून मतभेद आहेत. शाहरुखचा मित्र करण जोहरने सलमानसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोघांमधील मतभेद टोकाला गेल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे शाहरुखच्या जवळ असणार्‍या प्रियंका चोप्राने यशराज बॅनरसाठी सलमानसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुखचा मित्र अर्जुन रामपाल सलमानच्या 'बिग बॉस' शोमध्ये जाणार असल्याचे वृत्त आहे. अर्जुनने 'एक था टायगर'मधील सलमानच्या अभिनयाचे कौतुक केल्याने शाहरुख-सलमानमधील संबंध ताणले गेले आहेत.

अर्जुन रामपालने शाहरुखला घेऊन ओम शांती ओम, डॉन आणि रा. वनसारखे हिट चित्रपट दिले आहेत. तो आता सलमानला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.एखाद्याने शाहरुखशी पंगा घेतला किंवा शाहरुखने एखाद्याशी वैर पत्करले तर तो तुझा मित्र होतो काय, या प्रश्नावर सलमानने नकारार्थी उत्तर दिले.

शाहरुख आणि अर्जुनमधील मतभेदाबाबत सलमान म्हणाला की, अर्जुनची आणि माझी जवळीक आहे याची मला कल्पना नाही. संजय दिवाणच्या पार्टीमध्ये त्याची भेट झाली होती, त्या वेळी आम्ही फारतर दोन मिनिटे बोललो होतो.

Email Print
0
Comment