Home » Top Story » Sharukh-Kajol Romantic Couple On Screen - Sanona Portal Opion

शाहरुख-काजोल रुपेरी पडद्यावरील रोमँटिक जोडी

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 10:21AM IST

लंडन - ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’सारख्या चित्रपटांमुळे सुपरहिट ठरलेल्या शाहरुख खान-काजोल जोडीला बॉलिवूडमधील ऑल टाइम कपल म्हणून निवडण्यात आले आहे. ब्रिटनच्या सॅनोना पोर्टलने केलेल्या जनमत चाचणीनंतर हा अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. सॅनोना हे चित्रपट क्षेत्रातील घडामोडींचे विवेचन करणारे संकेतस्थळ आहे. शाहरुख-काजोल जोडीने एकेकाळच्या धर्मेंद्र-हेमा, राज कपूर-नर्गिस, अमिताभ बच्चन-रेखा या जोड्यांना पिछाडीवर टाकले. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातूनही लोकांकडून मते मागवण्यात आली होती. व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने ही पाहणी करण्यात आली होती. टॉप टेनच्या यादीतदेखील शाहरुखने बाजी मारली आहे. यादीत तो राणी मुखर्जीसोबत दुस-यादा निवडण्यात आला आहे. त्यामुळे त्याला ‘किंग ऑफ रोमान्स’ हे बिरुद लागू होते, असे सॅनोना वेबसाइटने म्हटले आहे.

टॉप टेनमध्ये रणबीर कपूर :

ऋषी कपूर-नीतू सिंग, अनिल कपूर-माधुरी दीक्षित यांचा टॉप टेन जोडीमध्ये समावेश आहे. रणबीर कपूर-कतरिना कैफ, शाहिद कपूर-प्रियंका चोप्रा यांचाही समावेश आहे. हृतिक-करिना तर 2003 च्या ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या चित्रपटानंतर कधीही एकत्र आले नाहीत.

‘लव्ह अ‍ॅक्चुअली ’ रोमँटिक चित्रपट :

ब्रिटनमधील सर्वात रोमँटिक चित्रपट म्हणून ‘लव्ह अ‍ॅक्चुअली’ची निवड झाली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या एका पाहणीत या चित्रपटाला कौल मिळाला आहे. ख्रिसमसच्या प्लॉटवर ही कथा मांडण्यात आली आहे. ‘द नोटबुक’ चाचणी दुस-या स्थानी राहिले. ‘वॉल -ई ’ चित्रपटाने तिसरे स्थान मिळवले.

Email Print
0
Comment