Home » Top Story » Special Reasons To Watch Special Chabbis

PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 13:37 PM IST
 • PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

  नीरज पांडे दिग्दर्शित 'स्पेशल 26' हा सिनेमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 8 फेब्रुवारीला हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित झाला. यापूर्वी नीरज पांडेंनी 'अ वेनस्डे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. आता तब्बल चार वर्षांनी नीरज पांडे आपला दुसरा सिनेमा घेऊन आले आहेत.
  अनेक चांगल्या कारणांसाठी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. उदाहरणार्थ, चागंला अभिनय, सर्वोत्तम दिग्दर्शन आणि दमदार स्टोरी. या कारणांमुळे हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक थिएटरकडे वळत आहेत.
  आज आम्ही तुम्हाला या सिनेमाच्या पाच पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल सांगत आहोत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हा सिनेमा का बघावा...

 • PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

  सस्पेन्स -

  'स्पेशल 26' हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ज्या लोकांना ही घटना ठाऊक आहे, ते लोकसुद्धा या सिनेमाची कथा काय असेल याचा अंदाज बांधू शकत नाहीत. सिनेमाच्या कथेत अनेक ट्विटस्ट आहेत. जबरदस्त सस्पेन्समुळे 'स्पेशल 26' हा सिनेमा अडीच तास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

 • PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

  दिग्दर्शन -

  दिग्दर्शक नीरज पांडेचा हा दुसरा सिनेमा आहे. नीरज पांडे यांना दुसरा सिनेमा दिग्दर्शित करायला तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला. नीरज पांडेचे दिग्दर्शक उत्तम आहे. हा सिनेमा यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे अनेक अवॉर्ड आपल्या नावी करु शकतो.

 • PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

  स्क्रिनप्ले आणि कला दिग्दर्शन -

  1987 साली घडलेल्या सत्य घटनेवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाची प्रॉडक्शन टीम प्रेक्षकांना 26 वर्षे मागे घेऊन जाण्यास यशस्वी झाली आहे. विंटेज कार, ग्रुप ऑटो, जुन्या बसेस हे सर्वकाही आपल्याला सिनेमात पाहायला मिळत. कला दिग्दर्शकाचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. सेट्स आणि लोकेशन्सला रेट्रो लूक देण्यात आला आहे.

 • PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

  अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचा अभिनय -

  अक्षय कुमारने यापूर्वी हाऊसफूल आणि गरम मसाला या सिनेमांमध्ये कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. मात्र या सिनेमांमधला अक्षयचा अभिनयसुद्धा दमदार वाटला नव्हता. मात्र 'स्पेशल 26'मधील अभिनयाने अक्षयने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. अनुपम खेर यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच दमदार झाला आहे.

 • PHOTOS : या 5 कारणांमुळे बघायला हवा 'स्पेशल 26'

  विनोदनिर्मिती -

  प्रोमोज पाहून हा सिनेमा खूप गंभीर स्वरुपाचा वाटतो. मात्र दिग्दर्शक नीरज पांडेने सिनेमात अनेक ठिकाणी विनोदनिर्मिती केली आहे. नीरज प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाला आहे.

Email Print
0
Comment