Home » Top Story » Stars And Their Luxurious Gifts To Wife

PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 10:51 AM IST
 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  बॉलिवूडमधील झगमगाट प्रत्येकालाच ठाऊक आहे. सगळे सेलिब्रिटी सिनेमांच्या माध्यमातून जेवढा पैसा कमावतात तेवढाच ते खर्चसुद्धा करतात. बॉलिवूड कलाकार आपल्या जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी त्यांना अतिशय महागडे गिफ्ट्स देत असतात. आपल्या जोडीदाराच्या चेह-यावरचे हास्य बघण्यासाठी हे कलाकार अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करतात.

  आज आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या अभिनेत्यांनी आपल्या जोडीदाराला दिलेल्या महागड्या गिफ्ट्सविषयी सांगत आहोत.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणकोणत्या अभिनेत्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च करुन आपल्या जोडीदाराला इम्प्रेस केले...

 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला तिचा पती राज कुंद्राने लग्नानंतर 2009 साली व्हॅलेंटाइन डेला 48 कॅरेटची हि-याची अंगठी भेट म्हणून दिली होती. शिवाय त्यानंतर राजने शिल्पाला लेम्बोर्गिनी ही कारसुद्धा भेट केली होती. या कारची किंमत तीन कोटींच्या घरात आहे. सोबतच राजने शिल्पासाठी इंग्लंडमध्ये एक शानदार मेन्शनसुद्धा घेतले आहे. त्या घराची किंमत 5.5 मिलियन पाऊंड इतकी आहे.

 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना
  अक्कीने त्याची पत्नी ट्विंकलला बेंटले कार भेट म्हणून दिली. या कारची किंमत तीन कोटी रुपये आहे. अक्षयने ही कार ट्विंकलला तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती.

 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  इमरान खान आणि अवंतिका मलिक
  इमरानने त्याची पत्नी अवंतिकाला रेड कलरची वोक्स्वागन बीटल कार गिफ्ट केली. या कारची किंमत तीस लाख रुपये आहे.

 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  काजोल आणि अजय देवगण
  दोन मुलांची आई असलेल्या काजोलला अजयने मुलगी न्यासाच्या जन्माच्या वेळी सेडान गाडी भेट म्हणून दिली होती. त्यानंतर काजोलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजयने तिच्यासाठी ऑडी क्यू सेवन ही कार खरेदी केली होती.

 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  संजय दत्त आणि मान्यता
  'अग्निपथ'ला मिळालेल्या यशानंतर संजय दत्तने पत्नी मान्यता दत्तला तीन कोटींची रोल्स रॉयल गाडी भेट म्हणून दिली होती.

 • PHOTOS: हे कलाकार आपल्या जोडीदारासाठी पाण्यासारखा खर्च करतात पैसा

  किरण राव आणि आमिर खान
  धोबी घाटच्या सक्सेसनंतर आमिरने त्याच्या टॅलेंटेड पत्नी किरणसाठी बेवरली हिल्स या पॉश परिसरात 75 कोटींचे आलिशान घर खरेदी केले होते.

Email Print
0
Comment