Home »Top Story» Sunil Shetty Birthday

बघा, B'DY BOY सुनिल शेट्टी यांचे काही खास फोटो

दिव्यमराठी वेब टीम | Aug 11, 2013, 14:35 PM IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टीचा आज वाढदिवस आहे. १९९२ मध्ये त्याने करिअरची सुरवात केली. त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळाली आहे. काही चित्रपटांमधील त्याची अदाकारी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे. सुनिल शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ मध्ये कर्नाटकमधील मंगळूर येथे झाला.

सुनिल शेट्टीची ओळख अॅक्शन हिरो अशी होती. मोहरा, धडकन, खेल, रक्त, भागम भाग, थॅंक्यू, कयामत, बॉर्डर इत्यादी चित्रपटांमधील त्याची भूमिका स्मरणात राहणारी आहे. २००१ मध्ये त्याला धडकन या चित्रपटातील अभिनयासाठी बेस्ट व्हिलनच्या फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीने त्याला अण्णा हे निकनेम दिले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकाराप्रमाणेच त्याने निर्माता म्हणूनही काम केले आहे. अॅक्टिंग करिअरला घरघर लागल्यावर त्याने हॉटेल व्यवसायात परतणे पसंत केले.

बघुयात सुनिल शेट्टी याचे काही खास फोटो पुढील स्लाईडमध्ये...

Next Article

Recommended