Sunny Leone beats Katrina Kaif, Salman and Saharuk

Home »Top Story» Sunny Leone Beats Katrina Kaif, Salman And Saharuk

कतरिना, सलमानला मागे टाकत सनी लियोन ठरली नंबर वन

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 18:25 PM IST

  • कतरिना, सलमानला मागे टाकत सनी लियोन ठरली नंबर वन

पोर्न स्टार सनी लियोन हे नाव आता सगळ्यांच्याच परिचयाचे झाले आहे. भट्ट कॅम्पच्या 'जिस्म 2' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच सनी लियोन छा गयी. खरे तर 'जिस्म 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. मात्र तरीदेखील सनीला त्याचा फटका बसला नाही. सनीच्या पदरी लगेचच दुसरा सिनेमाही पडला. सनी लवकरच एकता कपूरच्या रागिनी 'एमएमएस 2'मध्ये झळकणार आहे.

आता तर सनीने चक्क बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रीला धोबीपछाड दिली आहे. आम्ही हे का म्हणतोय याचाच विचार करत आहात ना... अहो सनीला अभिनयाचा साधा गंधही नसला तरीदेखील तिने कतरिना कैफला मागे टाकले आहे. सनी लियोनने कतरिना कैफला इंटरनेटच्या जगात मागे टाकले आहे. सनी लियोन 2012 मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलिब्रिटी ठरली आहे.

डिसेंबर 2012 मध्ये 3.5 कोटी लोकांनी इंटरनेटवर सनी लियोनला सर्च केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कतरिना कैफ इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी होती. मात्र सनी लियोनने कतरिनाला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे.

सनी लियोनच्या नावाने साडेतीन कोटी लोकांनी सर्च केले तर कतरिना कैफला केवळ 1.6 कोटी लोकांनी सर्च केले.
सनीने फक्त बी टाऊनच्या आघाडीच्या नायिकेला नव्हे तर नायकांनासुद्धा मागे टाकले आहे. सलमान खान, शाहरुख खान हे बॉलिवूडचे सुपरस्टारही सनीपुढे फिके पडले आहेत. सलमान खानला केवळ 1 कोटी लोकांनी सर्च केले तर शाहरुख खानला फक्त 48 लाख लोकांनी सर्च केले आहे.

एकंदरीतच काय तर सनीच्या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, असंच म्हणायला हवे.

Bollywood Gujarati News સાથે જોડાયેલા દરેક અપડેટ જાણવા માટે Divya Bhaskar ના Facebook અને Twitter ને લાઈક કરો
Web Title: Sunny Leone beats Katrina Kaif, Salman and Saharuk
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext