Home » Top Story » The Story Behind Kareena Kapoor And Saif Ali Khan's Affair

PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 11:57AM IST
 • PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

  बॉलिवूडचे हॉटेस्ट सेलिब्रिटी कपल अर्थातच सैफ आणि करीना आता ऑफिशिअली पती-पत्नी झाले आहेत. मात्र या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
  सैफ आणि करीनाची पहिली भेट 2003 मध्ये जे.पी.दत्ता यांच्या 'एल. ओ. सी कारगिल' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी झाली होते. त्यानंतर 2006 साली या दोघांनी विशाल भारद्वाजच्या 'ओंकारा' सिनेमात एकत्र काम केले होते. मात्र त्यावेळी हे दोघे एकमेकांबरोबर डेटिंग करत नव्हते.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बेगम आणि नवाबच्या प्रेमाची रोचक कहाणी...

 • PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

  2007 साली पहिल्यांदा हे दोघे डेटिंग करत असल्याची बातमी माध्यमांमध्ये आली होती. त्यावेळी करीना आणि शाहिदचे ब्रेकअप झाले होते. सैफ आणि करीना 'टशन' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान मुंबईत एकत्र फिरताना दिसले होते.

 • PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

  सैफच्या प्रेमात कशी पडली असा प्रश्न करीनाला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने सांगितले होते की, ''लद्दाखमध्ये 'टशन'चे शुटिंग सुरु होते. त्यावेळी माझी आणि सैफची सोशली भेट झाली होती. मात्र आम्ही दोघे एकमेकांबरोबर फारसे बोलत नव्हतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेथे एकेदिवशी सैफ स्विमिंग पुलच्या किना-यावर शर्टलेस होऊन बसला होता. तेव्हा त्याला बघून मी माझ्या मैत्रीणीला म्हटले, 'ही इज सो हॉट !'

 • PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

  त्यानंतर सैफ आणि करीना यांच्यात हळूहळू बोलणे सुरु झाले. एके दिवशी सैफने करीनाच्या नावाचा टॅटू स्वतःच्या हातावर काढून करीनाबरोबरच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

 • PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

  2007 साली सैफने मनीष मल्होत्राच्या एका कार्यक्रमात मीडियासमोर करीनाबरोबर डेटिंग करत असल्याचे कबूल केले होते.

 • PHOTOS : बेगम आणि नवाबच्या प्रेमाची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

  2008 साली सैफने घोषणा केली होती, की आगामी तीन-चार वर्षांत आम्ही लग्न करणार आहोत. कारण यावेळी आमच्यासाठी आमचे करिअर फार महत्त्वाचे आहे. अखेर गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरला हे दोघे लग्नगाठीत अडकले.

Email Print
0
Comment