Home » Top Story » Valentine Couple :Rishi Kapoor And Neetu Kapoor Fainted On Their Wedding

PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 12:38 PM IST
 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  नीतू सिंग आणि ऋषि कपूर यांना बॉलिवूडची बेस्ट जोडी म्हणून ओळखले जाते. अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र झळकली आहे. एकत्र काम करत असताना या दोघांचे सुत जुळले आणि 1979 साली हे दोघे विवाहबद्ध झाले.
  व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला या जोडप्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हे दोघे प्रेमात कसे पडले आणि या दोघांच्या लग्नात काय काय घडले होते...

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांनी 'जहरीला इंसान' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. मात्र त्यावेळी या दोघांचे सुत जुळले नव्हते. 'खेल खले में' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान हे दोघे जवळ आले होते.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  रफू चक्कर, दूसरा आदमी, कभी कभी, अमर अकबर एन्थनी या सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र झळकली. यादरम्यान ऋषि कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते. मात्र ऋषि कपूर यांनी नीतू सिंगचीच निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  1979 मध्ये या दोघांचा साखरपूडा आणि लग्न झाले. दोघांचेही लग्न धुमधडाक्यात पार पडले. यांच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  या दोघांच्या लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली होती. याबद्दल खूद्द नीतू सिंग यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. नीतू यांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी त्या बेशुद्ध पडल्या होत्या. ऋषि कपूर यांनासुद्धा लग्नात भोवळ आली होती. लग्नात नीतू सिंग यांनी परिधान केलेला लहेंगा खूपच भारी होता. तो लहेंगा सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  तर ऋषि कपूर त्यांच्या अवतीभोवती जमलेल्या गर्दीमुळे हैराण झाले होते. घोडीवर चढण्यापूर्वीच त्यांना लग्नात भोवळ आली होती.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  लग्नानंतर नीतू सिंग यांनी अभिनयाला रामराम ठोकला. त्याकाळी नीतू सिंग आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांची गणती बॉलिवूडच्या एव्हरग्रीन जोड्यांमध्ये केली जाते. या दोघांची जोडी ब-याच वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र 'दो दुनी चार' आणि 'लव्ह आज कल' या सिनेमाद्वारे या जोडीने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले.

 • PHOTOS: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषि कपूर आणि नीतू सिंग

  ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा रणबीर सिंग बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे.

Email Print
0
Comment