Home » TV » Big Boss 6 : Delnaaz Irani Evicted

'बिग बॉस'ने दाखवला डेलनाज इराणीला बाहेरचा रस्ता

दिव्य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 18:05 PM IST

बिग बॉसच्या घरातून डेलनाज इराणी एलिमिनेट झाली आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या कमी मतांमुळे डेलनाजला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. खरे तर आठवड्याच्या शेवटी बिग बॉसमधून एलिमिनेशन केलं जातं. मात्र या आठवड्यात एलिमिनेशन राऊंडमध्ये थोडा बदल करण्यात आला.

बिग बॉसच्या घरात एकुण सहा स्पर्धक राहिले होते. बिग बॉसने सहाही स्पर्धकांना घरातील गार्डन एरियात एकत्र जमायला सांगितले. सहा जणांपैकी कमी मते मिळालेल्या स्पर्धकाला ताबडतोब घर सोडून जावे लागेल असे सांगितले. डेलनाजला कमी मते मिळाल्याचे बिग बॉसने जाहीर केले. त्यामुळे डेलनाजला ग्रँड फिनाले अगदी तोंडावर आला असताना घराबाहेर पडावे लागले. डेलनाजचे झालेले एलिमिनेशन सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे आहे. कारण डेलनाज बिग बॉसच्या विजेतेपदाची दावेदार समजली जात होती.

या आठवड्यात म्हणजे 12 जानेवारीला बिग बॉसचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. आता सना खान, राजीव पॉल, उर्वशी ढोलकिया, इमाम सिद्दीकी आणि निकेतन या पाच जणांपैकी कोण बिग बॉसच्या सहाव्या पर्वाचा विजेता ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Email Print
0
Comment