Home »TV Guide» Birthday Special: Aamna Sharif Affair With Rajeev Khandelwal And Aftab Shivdasani

कधीकाळी या दोन अॅक्टरबरोबर होते 'कशिश'चे अफेअर, नंतर प्रोड्युसरसोबत केले लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Jul 16, 2017, 09:49 AM IST

मुंबई - टीव्हीची 'कशिश' या नावाने फेमस असलेली अभिनेत्री आमना शरीफ 16 जुलै रोजी 35 वर्षाची झाली आहे. आमनाने तिच्या अॅक्टींग करिअरची सुरुवात 2003 साली आलेली मालिका 'कहीं तो होगा' मधून केली. या शोमध्ये कशिशच्या भूमिकेने तिला प्रसिद्ध केले. अभिनेता राजीव खंडेलवालसोबत आमनाने या मालिकेत काम केले होते. शो सुरु झाल्यानंतर लगेचच या दोघांच्या डेटींगचे वृत्त आले होते. त्यानंतर हे दोघे अनेक शोज् , इवेंट्समध्ये सोबत दिसू लागले होते. या बॉलिवूड अभिनेत्यामुळे झाले ब्रेकअप..
-आमना आणि राजीव 2003 पासून एकत्र होते आणि त्यांची लव्ह लाईफही चांगली चालली होती.
- जवळपास 3 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले.
- हे रिलेशनशीप तुटण्याचे कारण आमनाचे आफताब शिवदासानीसोबत असलेले अफेअर सांगण्यात येते.
- 2009 साली या दोघांनी 'आलु चाट' या चित्रपटात सोबत काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांचे अफेअर सुरु झाले.
- दोघांनी नंतर 'आओ विश करे' या चित्रपटातही सोबत काम केले.
- आफताब आणि आमनाच्या रिलेशनशीपचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा राजीवने एका मुलाखतीदरम्यान आमना डेटींग करत असल्याचे सांगितले.
- त्याने सांगितले, मी काही महिन्यांपासून आमनाच्या टचमध्ये नाही आणि आम्ही 3 वर्ष सोबत काढले पण आता आमच्यात काहीही नाते नाही.
- राजीवनंतर आफताबसोबतही आमनाचे रिलेशनशीप चालले नाही. दोघे जवळपास 3 वर्षे सोबत राहिल्यानंतर वेगळे झाले.
- त्यानंतर आमनाने चित्रपट निर्माता अमित कपूरबरोबर लग्न केले.
1 वर्ष डेटींगनंतर केले लग्न..
- आफताबसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आमनाने निर्माता अमित कपूरबरोबर लग्न केले.
- दोघांनी एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. 27 डिसेंबर 2013 साली त्यांचे लग्न झाले.
- दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन ताज लँडमध्ये ठेवण्यात आले होते.
- दोघांना आता एक मुलगा आहे त्याचे नाव आरन आहे. त्याचा जन्म सप्टेंबर 2015 साली झाला.
पुढच्या स्लाईडवर पाहा, आमनाच्या लग्नाचे काही PHOTOS..

Next Article

Recommended