Home » TV » Deepshikha Nagpal And Keshav Arora Eliminated From Nach Baliye 5

'नच बलिये 5'मधून दीपशिखा-केशव एलिमिनेट

भास्कल नेटवर्क | Jan 08, 2013, 15:29PM IST

'नच बलिये'चे पाचवे पर्व अलीकडेच छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. यंदाच्या आठवड्यात एक जोडी 'नच बलिये'चा मंच सोडून जाणार आहे. ही एलिमिनेट झालेली जोडी म्हणजे दीपशिखा आणि केशव ही आहे.

या शोमध्ये सेलिब्रिटी कपल्स आपल्या नृत्याची झलक दाखवत आहेत. यंदाच्या आठवड्यात कुशल टंडन-एलिना आणि दीपशिखा-केशव या दोन जोड्या डेंजर झोनमध्ये आल्या होत्या. मात्र प्रेक्षकांचे कमी वोट्स मिळाल्यामुळे दीपशिखा आणि केशवला हा मंच सोडून जावे लागले. 'नच बलिये'च्या पाचव्या पर्वातून एलिमिनेट झालेली ही पहिली जोडी आहे.

आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी दीपशिखा आणि केशवने जीवतोड मेहनत घेतली. मात्र प्रेक्षकांचे कमी वोट्स मिळाल्यामुळे त्यांना लवकरच या मंचाचा निरोप घ्यावा लागला. आता पुढच्या आठवड्यात कोणते सेलिब्रिटी कपल हा मंच सोडून जाणार याचीच उत्सुकता आहे.

Email Print
0
Comment