Home » TV » In Pics: Real Bigg Boss With Veena Malik, Sonakshi Sinha And Many Others

PHOTOS : वीणा आणि सोनाक्षी ख-या 'बिग बॉस'सोबत

भास्कर नेटवर्क | Feb 23, 2013, 14:04PM IST
1 of 8

अभिनेता सलमान खान बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा होस्ट असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. सलमानमुळेच बिग बॉसला वलय प्राप्त झालं आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या पडद्यामागची गोष्ट सांगत आहोत.
'बिग बॉस चाहते है...' हे बिग बॉसच्या घरातील शब्द तुम्हाला आठवत असतीलच ना. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांशी बोलणारा आवाज कुणाचा हे तुम्हाला ठाऊक आहे का ? नाही ना... चला तर आज आम्ही तुम्हाला पडद्यामागील बिग बॉसची ओळख करुन देत आहोत.
हा आवाज आहे अतुल कपूर यांचा. वरील छायाचित्रात दिसणारे अतुल कपूर यांचा व्हाईस ओव्हर बिग बॉस या शोसाठी वापरला जातो. त्यांच्या आवाजाचे अनेक चाहते भारताबरोबरच भारताबाहेरसुद्धा आहेत.
आज आम्ही तुम्हाला अतुल कपूर यांची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये अतुल कपूर बिग बॉसच्या स्पर्धकांबरोबर दिसत आहेत.

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 
Email Print
0
Comment