Home »TV Guide» Inside Photos Of The House Of Tappu Aka Bhavya Gandhi

3 कोटींच्या घरात राहतो 'तारक मेहता...' चा Ex-टप्पू, आतून असे आलिशान आहे घर

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 10:07 AM IST

मुंबई - काही महिन्यांपूर्वी टप्पू म्हणजेच भव्य गांधीने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा प्रसिद्ध शो सोडला आहे. त्याचा पहिला गुजराती चित्रपट 'पापा तमने नै समजाय' ऑगस्टमध्ये रिलीज झाला असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पर्सनल लाईफचा विचार करता भव्य पॅरेंट्सबरोबर बोरीवली, मुंबईत एका 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतो, आणि त्याच्या घराची किंमत 3 कोटी असल्याचे सांगितले जाते.

ऑनस्क्रीन कॅरेक्टरच्या अगदी वेगळा आहे भव्य...
- आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भव्य गांधीची आई यशोदा गांधी म्हणाल्या, भव्य त्याच्या गाजलेल्या ऑनस्क्रीन कॅरेक्टर म्हणजे टप्पूपेक्षा अगदी वेगळा आहे. रियल लाईफमध्ये तो फार मॅच्युअर आहे. काळाबरोबर भव्यमध्ये बराच बदल झाला आहे. तो कुटुंब आणि मित्रांबरोबर जास्त वेळ घालवतो. त्याला ते आवडते. किमान एक तास मित्र कुटुंबाबरोबर घालवता येईल याची तो काळजी घेतो. मला त्याच्यावर अभिमान वाटतो.

घरात याठिकाणी जास्तवेळ राहतो भव्य
- यशोदा सांगतात, घरात एका कोपऱ्यात अनेक झाडे लावलेली आहेत. याठिकाणी आणि विशेषतः तुळशीजवळ बसून राहायला त्याला प्रचंड आवडते. सध्या तो शंकरावर आधारित एक पुस्तक वाचतो आहे. त्याला देवावर प्रचंड श्रद्धा आहे आणि घरात प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकता असाली असे त्याला वाटते. त्याचत्या गुरुचीही तो पुजा करतो.

नवीन घर खरेदी करण्याचा विचार..
- रिपोर्ट्सनुसार भव्य आणि त्याचे कुटुंब सध्या ज्या 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतात त्याचा आकार जवळपास 1100 स्क्वेअर फूट आहे. त्यामुळे ते लवकरच 4BHK अपार्टमेंट खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
- भव्य बाबत सांगायचे झाल्यास 20 जून 1997 ला त्याचा जन्म मुंबईत झाला. 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये टप्पूच्या भूमिकेतून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्याने करिअर सुरू केले होते. त्यानंतर त्याने काही जाहिरातीदेखिल केल्या.
- 2008 पासून फेब्रुवारी 2017 पर्यंत तो 'तारक मेहता...' चा भाग होता. त्यानंतर त्याने हा शो सोडला आहे.
- भव्यने बॉलिवुड चित्रपट 'स्ट्राइकर' (2010) मध्ये काम केले आहे. त्याला भविष्यात डायरेक्टर बनण्याची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भव्य गांधीच्या घरातील काही PHOTOS
फोटो : अजित रेडेकर

Next Article

Recommended