Home »TV Guide» Rakesh Bedi Daughter Ridhima Bedi Stunning Photos

ही आहे टीव्हीच्या 'दिलरुबा'ची स्टायलिश मुलगी, लवकरच करणार अॅक्टींग डेब्यू

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 15:53 PM IST

मुंबई - टीव्ही शो 'श्रीमान-श्रीमती'मधील दिलरुबाची भूमिका करुन प्रेक्षकांना हसवणारे राकेश बेदी सध्या भाभीजी घर पर है या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. राकेश या शोमध्ये अंगुरी भाभीच्या वडिलांचा रोल करत आहेत. यादरम्यान अशा चर्चा आहेत की राकेश यांची मुलगी रिद्धीमा बेदी लवकरच तिचा अॅक्टींग डेब्यू करणार आहे. एका म्युझिक व्हिडिओमधून डेब्यू करत आहे रिद्धीमा..
- रिद्धीमा तिचा अॅक्टींग डेब्यू म्युझिक व्हिडिओ तेरी कहानियामधून करत आहे.
- या गाण्यामध्ये रिद्धीमा ट्रॉयडिन गोम्स(Troydin Gomes)आणि आरिफ सईद(Arif Syed)सोबत करत आहे.
- रिद्धीमा अनेक दिवसांपासून डेब्यूचा प्लान करत होती पण आता तिला तिच्या मनालारखा प्रोजेक्ट मिळाला आहे.
- या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन मनीष निरवाल करत आहेत तर लिरीक्स राघव दत्त यांनी लिहीले आहेत.
सोशल मीडियावर फार सक्रिय आहे रिद्धीमा..
- रिद्धीमा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
- रिद्धीमाच्या फोटोंवरुन तिला सेल्फी घेण्याचा फार शौक असल्याचे कळते.
या शोमध्ये केले आहे राकेश यांनी काम..
- राकेश यांनी 'ये जो हैं जिंदगी'(1984) मधून डेब्यू केला होता पण त्यांना ओळख 1994 साली आलेल्या 'श्रीमान-श्रीमति' मधून मिळाली.
- यानंतर त्यांनी 'राहत'(1995), 'हम सब एक हैं'(1998), 'येस बॉस'(1999), 'गुब्बारे'(2000), 'FIR'(2007), 'शुभ विवाह'(2012), 'कुबूल है'(2013), 'खिड़की'(2016) 'यारों का टशन'(2016) यांसारख्या शोमध्ये काम केले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, रिद्धीमाचे स्टायलिश फोटोज्....

Next Article

Recommended