Home »TV Guide» Yeh Hai Mohabbateins Divyanka Tripathi Is A Fitness Freak, Divyanka Tripathi

Fat to Fit : 'ये है मोहबब्ते' च्या 'इशिता' ने घटवले 10 kg वजन, हे आहे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 09:00 AM IST

टीव्ही सिरियल 'ये है मोहब्बते' ची 'इशिता' म्हणजे दिव्यांका त्रिपाठी सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. तिने सांगितले की, सिरियलची शुटिंग आणि जखमी झाल्याने ती स्वतःवर लक्ष केंद्रीत करू शकत नव्हती. त्यामुळे तिचे वजन वाढले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून तिने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले आणि सुमारे 10 किलो वजन घटवले आहे.

फिट राहणे सुरू केले..
दिव्यांकाने सांगितले की, तिने 'नच बलिए 8' मध्ये सहभागी होण्यापूर्वीच स्वतःला फिट ठेवणे सुरू केले होते. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाएटवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत होती. तिने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेयर केले. त्यात ती बरीच बारीक दिसत आहे. तिने फोटो शेयर करत त्याबरोबर लिहिले, 'Even #Gymfies are important.#FeelGoodFactor'. दिव्यांका नेहमी इन्स्टाग्रावर फोटो शेयर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 50 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दिव्यांकाचे इतर काही PHOTOS...

Next Article

Recommended