Home » Hollywood » Actor Dead While Enacting In Suicide Sence

अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू, सुसाईड सीन करतांना प्रत्यक्षात लागला फास

भास्कर नेटवर्क | Apr 25, 2012, 14:36 PM IST

ब्राझीलच्या साउ पाउलोमध्ये २७ वर्षीय तिएगो क्लिमेकचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान आत्महत्येच्या एका दृश्यात प्रत्यक्षात फास लागल्यामुळे तिएगोचा मृत्यू झाला.

सविस्तर बातमी अशी आहे की, ६ एप्रिलला गुड फ्रायडेच्या दिवशी ईस्टर प्लेमध्ये तिएगो जूडास इस्कैरिएटची भूमिका करत होते. त्यादिवशी मोकळ्या मैदानात त्यांच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. या नाटकाच्या एका दृश्यात जुडासची भूमिका करणारे तिएगो फास लावून आत्महत्या करणाचा सीन करत होते. त्यावेळी तिएगोच्या गळ्यात अडकलेल्या दोरीने त्यांचा गळा आवळला गेला. तिएगो फास लागलेल्या अवस्थेत चार मिनिट होते. मात्र नाटक बघणा-यांना तिएगो अभिनय करत असल्याचे वाटले. तोपर्यंत तिएगो बेशुद्ध पडले होते. ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले. १७ दिवसांनंतर २३ एप्रिलला तिएगोचा मृत्यू झाला.


Email Print
0
Comment