Home » Marathi Katta » Actress Ashwini Bhave In 'Aajcha Divas Maza' Marathi Film

'आजचा दिवस माझा'द्वारे अश्विनी भावेंचे कमबॅक

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 15:01PM IST

अभिनेत्री अश्विनी भावे तब्बल पाच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा' या सिनेमात अश्विनी भावे झळकणार आहेत. लग्नानंतर अमेरिकते स्थायिक झालेल्या अश्विनी भावे पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत कुलकर्णी यांच्याच 'कदाचित' या सिनेमात आपल्याला दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर एक सांगितिक रियालिटी शोसुद्धा जज केला. मात्र मोठ्या पडद्यावर त्यांचे दर्शन घडले नाही. आता 'आजचा दिवस माझा' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा अश्विनी भावे मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

या सिनेमात अश्विनी भावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची भूमिका साकारली असून त्यांच्यासोबत सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, हृषिकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

राजकिय पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

Web Title: Actress Ashwini Bhave in 'Aajcha Divas maza' marathi film
(News in Hindi from DainikBhaskar)
Email Print
0
Comment