Home » Top Story » Anjana Sukhani Item Number In Kamal Dhamal Malamal Film

आयटम गर्ल झालेली अंजना आपल्या डान्सने माजवणार धूम

दिव्य मराठी वेब टीम | Apr 25, 2012, 12:56PM IST

मुंबई - ही आहे अंजना सुखानी. २०१०मध्ये आलेल्या 'अल्लाह के बंदे' या सिनेमात ती झळकली होती. अभिनेत्रीपासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अंजना आता आयटम गर्ल म्हणून झळकणार आहे. प्रियदर्शनच्या आगामी 'कमाल धमाल मालामाल' या सिनेमात अंजना तडफदार आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरचे एक छायाचित्र रिव्हील करण्यात आले आहे. या छायाचित्रात लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेली अंजना हॉट दिसत आहे. हा आयटम नंबर पोनी वर्माने कोरिओग्राफ केला आहे.

'कमाल धमाल मालामाल' या सिनेमात परेश रावल, ओम पुरी, नाना पाटेकर, असरानी, शक्ती कपूर, श्रेयस तळपदे, रज्जाक खान आणि नीरज पाठक झळकणार आहे. यावर्षी २८ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Email Print
0
Comment