Home » Top Story » Famous Music Director Ravi Is No More

प्रसिद्ध संगीतकार रवी यांचे निधन

दिव्य मराठी वेब टीम | Mar 08, 2012, 10:48AM IST

मुंबई - प्रसिद्ध संगीतकार रविशंकर उर्फ रवी यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

रवी यांच्या पश्चात मुलगा अजय आणि सून वर्षा उषागांवकर हे आहेत. वर्षा उषागांवकर मराठी चित्रपटसृष्टीतली नावाजलेली अभिनेत्री आहे.

रवी यांनी चार दिवसांपूर्वीच आपला ८६वा वाढदिवस साजरा केला होता.

रवी यांनी चौदहवीं का चांद, दो बदन, हमराज, आंखे, निकाह, वक्त, नील कमल, गुमराह यांसारख्या चित्रपटांना संगीत दिलं होतं. बी. आर चोप्रांच्या प्रमुख सिनेमांमध्ये त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं होतं.Email Print
0
Comment