Home » Top Story » Isha Deol And Bharat Takhatani Wedding Reception

PHOTOS : आज ईशा-भरतची रिसेप्शन पार्टी, सगळ्यांच्या नजरा सनी-बॉबीवर

दिव्य मराठी वेब टीम | Jun 30, 2012, 11:21AM IST
1 of 19

मुंबई - धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लाडकी कन्या ईशा देओल शुक्रवारी भरत तख्तानीबरोबर लग्नगाठीत अडकली. या दोघांचा लग्नसोहळा जुहूच्या इस्कॉन मंदिरात अगदी साध्या पद्धतीने झाला. लग्न साध्या पद्धतीने झाले, मात्र शनिवारी म्हणजेच आज शानदार रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

या पार्टीत सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावणार की नाही, यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण शुक्रवारी ईशाचे हे दोन्ही भाऊ लग्नात उपस्थित नव्हते. ईशा सनी आणि बॉबीची सावत्र बहीण आहे.

ईशाच्या लग्नात जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत बॉलिवूडमधले अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत.

पाहा, ईशा-भरतच्या लग्नाची छायाचित्रे... 
Email Print
0
Comment