Home » Marathi Katta » Jai Maharashtra Dhaba Bhatinda Music Launch

PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

दिव्य मराठी वेब टीम | Jan 24, 2013, 12:38 PM IST
 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा
  अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पुण्यात झोतात पार पडला. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी अवधूत गुप्तेसह या सिनेमाचे संगीतकार निलेश मोहरीर, गायक स्वप्नील बांदोडकर, गायिका जान्हवी प्रभू-अरोरासह सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेले अभिजीत खांडकेकर आणि प्रार्थना बेहरे हे कलाकारही हजर होते.
  या म्युझिक लाँच सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने पुणेकरांनीही हजेरी लावली होती.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे...
 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रांगणात हजारो पुणेकर रसिकांच्या उपस्थितीत सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  'झेंडा' आणि 'मोरया' या सिनेमाच्या यशानंतर अवधूत गुप्ते 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  या सिनेमाला संगीतकार निलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे. तर गुरु ठाकूर यांनी सिनेमातील गाणी लिहिली आहेत.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  या कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू-अरोरा यांनी या सिनेमातील खास गाणी सादर केली.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  वैशाली सामंत यांनीही सिनेमातील गाणी या कार्यक्रमात सादर केली.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  कोल्हापूरचा मराठमोळा थाट आणि पंजाबच्या मातीचा रांगडा बाज असलेल्या या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  यावेळी उर्मिला कानेटकरने आपल्या दमदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  अभिनेता अभिजीत खांडकेकरचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिजीत यापूर्वी झी मराठी वाहिनीवरील 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत झळकला होता.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  अवधूत गुप्ते यांनी या सिनेमात स्पेशल अपिअरन्स दिला आहे. एका गाण्यात अवधूत गुप्ते अभिजीत खांडकेकरबरोबर सिनेमात दिसणार आहे. या कार्यक्रमात अवधूत आणि अभिजीतनेही त्याच गाण्यावर परफॉर्म केले.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

 • PHOTOS : पुण्यात थाटात रंगला 'जय महाराष्ट्र...'चा म्युझिक लाँच सोहळा

  प्रियदर्शन जाधवची स्टँडअप कॉमेडी आणि पुष्कर श्रोत्रीच्या खुमासदार सुत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.

Email Print
0
Comment