Home » TV » Pavitra Rishta Fame Sushant Singh's Bollywood Entry

'काई पो छे'मधून सुशांतची बॉलीवूडमध्ये एंट्री

दिव्य मराठी वेब टीम | May 04, 2012, 10:24AM IST

छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतील मानवच्या भूमिकेने घराघरात पोहचलेला सुशांत सिंग राजपूत आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. चेतन भगतच्या प्रसिद्ध ' थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या कादंबरीवर बनत असलेल्या 'काई पो छे'या चित्रपटाद्वारे सुशांत मोठ्या पडद्यावरची इनिंग सुरु करणार आहे. रॉकऑन फेम अभिषेक कपूर हा सिनेमा दिग्दर्शित करत असून सुशांतसह या चित्रपटात राजकुमार यादव, अमित साध हे नवीन चेहरेही झळकणार आहेत. या तिघांची 150 न्यूकर्मसच्या ऑडिशनमधून निवड झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गुजरातमध्ये सुरू झाले आहे. 'पवित्र रिश्ता'बरोबरच 'झलक दिखला जा' मधून सुशांतने छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळवली आहे.

Email Print
0
Comment