Home » Marathi Katta » 'Pune 52' Release In PVR

PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 17:03PM IST
 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  गिरीश कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला 'पुणे 52' हा सिनेमा नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय. 18 जानेवारीला रिलीज होणारा हा सिनेमा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात रिलीज होणार आहे.

  पीव्हीआर ग्रुपने 'डिरेक्टर रेअर'साठी या सिनेमाची निवड केली आहे. पीव्हीआर हा सिनेमा भारतातील प्रमुख शहरांमध्ये रिलीज करणार आहे. इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि आरभाटची निर्मिती असेलला हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर आहे.

  गिरीश कुलकर्णीची प्रमुख भूमिका असेलल्या 'पुणे 52' या सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  निखिल महाजनने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. निखिलने ऑस्ट्रेलियाच्या इंटरनॅशनल फिल्म स्कलू सिडनीमधून निर्मिती आणि दिग्दर्शनाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 'पुणे 52' हा निखिलचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  या सिनेमाविषयीची खास गोष्ट म्हणजे देशविदेशात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पीव्हीआर ग्रुपने 'डिरेक्टर रेअर'साठी या सिनेमाची निवड केलीआहे. प्रादेशिक भाषेतील दर्जेदार सिनेमे भारतातील इतर शहरांमध्ये पोहचवण्यासाठी पीव्हीआरने 'डिरेक्टर रेअर 'हा उपक्रम सुरु केला आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  मुंबई आणि पुण्यासह हा सिनेमा दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणीही रिलीज करण्यात येणार आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  या सिनेमा इंग्रजी सबटायटलबरोबर रिलीज होतोय. त्यामुळे मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी प्रेक्षकसुद्धा हा सिनेमा बघण्याची संधी मिळणार आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  भारतातील विविध राज्यांत रिलीज होणारा 'पुणे 52' हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  इंडिया गोल्ड आणि आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'पुणे 52' चे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  एका गुप्तहेराच्या कारकिर्दीवर तसेच त्याच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात सई ताम्हणकरने नेहा नावाचे पात्र साकारले आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  नेहा ही व्यक्तीरेखा कथेला कलाटणी देणारी असल्याचे सईने सांगितले.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  सोनालीच्या भूमिकेचे वेगळेपण किंवा सर्वसामान्यपण असे की तिला खास पुणेरी मध्यमवर्गीय स्त्रीचा टच देण्यात आला आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री ते आता टिप्पीकल मध्यमवर्गीय पुणेकर असा वैविध्यपूर्ण आलेख सोनालीच्या अभिनयाचा आहे.

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  कॅमे-यामागे मस्तीच्या मुडमध्ये सई ताम्हणकर आणि भारती आचरेकर

 • PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

  हा सिनेमा सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे त्याच पद्धतीने सिनेमाचे पोस्टर तयार करण्यात आले आहेत.

Email Print
0
Comment