Home » Marathi Katta » Uncha Maza Zoka Serial Gets 27 Lakhs Concession But Producer Want More Concession

'उंच माझा झोका'ला 27 लाखांची सूट देऊनही निर्मात्याला हवी आणखी सवलत

प्रतिनिधी | Feb 23, 2013, 12:31PM IST

मुंबई - ‘उंच माझा झोका’ या मालिकेला चित्रनगरीत चित्रीकरणात सूट दिल्यामुळे 27 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. तरीदेखील सरकारकडून आणखी फायदा मिळवण्याचा प्रयत्न निर्माता वीरेंद्र प्रधान करत असल्याची माहिती सांस्कृतिक विभागातील एका ज्येष्ठ अधिका-याने दिली.


रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित ‘उंच माझा झोका’ ही मालिका गेल्या वर्षी झी मराठीवर सुरू झाली होती. या मालिकेचा गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत सेट लावण्यात आला होता. काही काळानंतर निर्माता प्रधान यांनी मालिकेवर राज्य सरकार कसा अन्याय करत आहे याचा आव आणला. त्यांचा हा कांगावा शिवसेना आणि मनसेच्या चित्रपट शाखांना समजलाच नाही. त्यामुळे त्यांनी प्रधान यांना मदत केली. राज्य सरकारतर्फे मराठी चित्रपटांना अनुदान दिले जाते. चित्रनगरीत चित्रीकरणाच्या वेळी सवलतही दिली जाते. ‘उंच माझा झोका’लाही सवलत दिली गेली. प्रधान यांनी झी मराठीला जेव्हा प्रोजेक्ट सादर केला तेव्हा त्याच्या खर्चासहित सादर केला होता. तेव्हाच चित्रनगरीत सेट लावण्याचे त्याने ठरवले होते. झीने पैसे मंजूर केल्यानंतर सांस्कृतिक विभागाकडून सवलत घेतली. त्यामुळे प्रधान यांना 27 लाखांचा फायदा झाला आहे. सरकारकडून मराठी चित्रपटाला 25 लाख रुपये अनुदान दिले जाते त्यापेक्षा ही रक्कम जास्तच आहे. फायदा झाल्यानेच त्यांनी ‘राधा ही बावरी’ ही दुसरी मालिका सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. सेटसाठी प्रत्येक महिन्याला 8 लाख रुपये घेतले जातात. परंतु झोका किंवा अन्य मराठी मालिकांसाठी फक्त सव्वा दोन लाख रुपये आकारले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रत्येक भागांत 1 लाख : प्रधान
मी माझ्यासाठी काही मागत नाही. मराठीच्या संवर्धनासाठी चित्रनगरी उभारली; परंतु तेथे मराठी मालिकांना सवलत दिली जात नाही. ही सवलत मिळावी म्हणून मी प्रयत्न करत आहे. मला प्रत्येक एपिसोडमागे एक लाख रुपये सुटले; परंतु याचा अर्थ असा घ्यायचा की पुढील वर्षी सरकारने माझ्याकडून ते वसूल करावेत का? मात्र वारंवार विचारूनही प्रधान यांनी झोकासाठी किती खर्च येतो आणि झी वाहिनीकडून किती पैसे मिळतात याची माहिती त्यांनी दिली नाही.

Email Print
0
Comment