Home »Business »Gadget» Op Internet Users In All Over World

पोर्न साईट्‍स पाहण्यासाठी भारतात होतो इंटरनेटचा सर्वाधिक वापर!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 20, 2013, 14:21 PM IST

भारतासह आखाती देशात इंटरनेटचा सर्वाधिक वापर हा पोर्न साईट्‍स पाहण्यासाठी केला जात असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील युजर्स लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इंटरनेटचा वापर करत असल्याचेही दिसून आले आहे.

इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींसाठी होत आहे. परंतु काही देशांचा अभ्यास केल्यास इंटरनेटचा वापर महत्त्वपूर्ण कामासाठी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

साऊथ कोरियामध्ये इंटरनेटचे स्पीड हे अन्य देशांच्या तुलनेत खूप फास्ट आहे. तेथे अवघ्या 20 सेकंदात तीन तासांची मूव्ही डाऊडलोड करता येतो. यावरून साऊथ कोरियात इंटरनेटचे स्पीड किती असेल याचा अंदाज आपल्याला लावता येतो.

भारतात इंटरनेट खंडीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताचा जगातील अशा देशांच्या यादीत समावेश आहे की, तेथे इंटरनेट खंडीत होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे भारतात इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सची (ग्लोबल आयएसपी) संख्या ही दिवसेंदिवस घटत आहे. भारतात इंटरनेट सेवा चीन-अमेरिका सारख्या देशांच्या तुलनेत खूप महागडी आहे. तसेच सेवेपासून इंटरनेट स्पीडबाबतही अनेक समस्या आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या... भारतासह अमेरिका, चीन, जापानसारख्या देशांत इंटरनेटचा वापर कसा आणि कोणत्या कामासाठी केला जातो. तसेच या देशात इंटरनेटची स्पीड किती आहे.

Next Article

Recommended