s&p cuts india’s outlook to negative

Home »Business »Share Market» S&P Cuts India’S Outlook To Negative

एस अँड पीने पुन्‍हा घटविले भारताचे पत मानांकन

वृत्तसंस्था | Apr 25, 2012, 15:03 PM IST

  • एस अँड पीने पुन्‍हा घटविले भारताचे पत मानांकन

नवी दिल्लीः स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने भारताची आर्थिक पत पुन्‍हा एकदा कमी केली आहे. भारताचे रेटींग 'स्‍टेबल'पासून 'निगेटीव्‍ह'वर केले आहे. परिस्थिती न सुधारल्‍यास रेटींगमध्‍ये आणखी घट होऊ शकते, असेही संस्‍थेने स्‍पष्‍ट केले आहे. देशातील सध्याची राजकीय अस्थिरता, सतत उघड होत असलेले घोटाळे, विकासाचा मंदावलेला वेग, गुंतवणुकीचे कमी झालेले प्रमाण आणि वाढणारी आर्थिक तूट पाहता भारताची आर्थिक पत आणखी घसरण्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे. एस अँड पी संस्‍थेने भारताचे मानांकन BBB+ वरुन BBB- असे केले आहे.
एस अँड पी काही महिन्‍यांपूर्वी संस्थेने भारताची आर्थिक पत स्थिर स्थितीपेक्षा किंचित खालावल्याचे जाहीर केले होते. मात्र लवकरच पत पुन्हा एकदा स्थिर असल्‍याचे जाहिर केले होते. परंतु, आता पुन्‍हा पत कमी केली आहे. एस अँड पी संस्थेने भारताची पत खालावल्याचे जाहीर करताच शेअर बाजारात विक्रीचा मारा सुरु झाला. शेअर बाजारात घसरण झाली. परंतु, शेअर बाजार काही तासांमध्‍येच सावरले. या पतनिश्चितीला घाबरण्‍याचे कारण नसल्‍याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्‍हटले आहे. तर अर्थमंत्रालयाच्‍या सुत्रांनीही धोका नसल्‍याचा दावा केला आहे.
भारत मजबूत स्थितीत, पत मानांकन घसरणार नाही: एस अँड पी
फ्रान्स, इटलीसह 7 युरोझोन देशांची पत घटवली
अमेरिकेची आर्थिक 'पत' घालविण्यास 'हा' भारतीय कारणीभूत

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: s&p cuts india’s outlook to negative
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext