don't expect others which you can not fulfill

Home »Divya Marathi Special» Don't Expect Others Which You Can Not Fulfill

स्वत: करत नसलेल्या कामांची अपेक्षा ठेवू नका

विजय बत्रा | Jan 06, 2013, 02:48 AM IST

  • स्वत: करत नसलेल्या कामांची अपेक्षा ठेवू नका

सर्वप्रथम मी सर्व वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नव्या वर्षात स्वत:बरोबरच इतरांचाही विचार कराल अशी अपेक्षा करतो.
काही दिवसांपूर्वी मी माझा मुलगा गौरवशी बोलत होतो. गौरव इंजिनिअरिंगला आहे. तो तामिळनाडूत शिक्षण घेत आहे. हिवाळ्यातील सुट्यांमध्ये तो घरी आला होता. बोलताना मी गमती-गमतीत त्याला विचारले, ‘आई-वडील म्हातारे झाल्यावर तू त्यांची काळजी घेशील?’ तो हसला. म्हणाला, ‘बाबा, मी काही नर्स नाही. मी तुमचा मुलगा आहे.’ हे ऐकून मी गप्प बसलो. आपण स्वत:विषयी खूप विचार करतो याची मला जाणीव झाली. इतर लोक आपली मदत कशी करू शकतील याचाही विचार करतो, पण असा विचार करून आपण स्वत:ला परावलंबी बनवतो.
याउलट स्वत: सक्षम असण्यातून तसेच इतरांची मदत करण्याविषयी विचार करण्यातून खरा आनंद मिळतो. संध्याकाळी एकांतात असताना मला जाणवले की, माझा मुलगा होस्टेलमध्ये एकटा, स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आणि सुखी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. मी उगीच त्याच्यावर भविष्याचे ओझे टाकून दबाव आणला. ते तर खूप दूर आहे.
मी शांतपणे विचार केला. मुलाचे उत्तर ऐकून मी रागावलो असतो तर.. तुझ्या शिक्षणासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करत आहोत आणि भविष्याबाबत विचारल्यास मी काय नर्स आहे असे म्हणतोस?.. मी असे म्हटले असते तर त्याला वाईट वाटले असते. आमच्या नात्यात दुरावा आला असता. मी आत्मचिंतन केले. मुलाच्या नात्याने मी माझ्या वडिलांची देखभाल करतो का? त्यांना चांगले आयुष्य देतो का?
मला ‘नाही’ असेच उत्तर मिळाले. हा विचार केल्यानंतर मी स्वत:ला वचन दिले की, मी मुलाकडून जी अपेक्षा करत आहे ते सर्व काही माझ्या वडिलांसाठी करेन. त्यांना खुश ठेवेन. मी वर्तमानात जगेन. आजचा आनंद घेईन. भविष्याचा विचार करून वेळ वाया घालवणार नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ देणार नाही.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: don't expect others which you can not fulfill
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext