keep possible aim for success

Home »Divya Marathi Special» Keep Possible Aim For Success

साध्य करता येतील अशीच ध्येयं बाळगा

विक्रम छाछी | Jan 06, 2013, 02:38 AM IST

  • साध्य करता येतील अशीच ध्येयं बाळगा

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन वर्षात कामाची यशस्वी सुरुवात करण्याचा संकल्प करा. तज्ज्ञांशी चर्चा करून मागील आठवड्यात करिअरशी संबंधित काही संकल्पांची माहिती देण्यात आली होती. या वेळी नवीन पाच संकल्पांविषयी...


सहका-यांशी चांगले संबंध निर्माण करा : कार्यालयात सोबत काम करणा-यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी कार्यालयात सकारात्मक विचार करण्यासारख्या छोट्या छोट्या युक्त्या वापरा. अन्य लोक आपल्याबाबत काय विचार करतील याचा विचारच करू नका. टीमच्या सदस्यांच्या वाढदिवसाची यादी तयार करून कॅलेंडर किंवा संगणकाजवळ चिकटून ठेवा. त्यांचा हा खास दिवस संस्मरणीय होण्यासाठी योगदान द्या. उद्या सहकारी तुमचा बॉसही बनण्याची शक्यता आहे.


यशाचे अवलोकन करत राहा : करिअर योग्य दिशेने नेण्यासाठी वेळोवेळी यशाचे आकलन करत राहा. तुम्ही कुठे आहात? हे सहा महिने किंवा वर्षभरानंतर तपासून पाहा. भविष्याच्या दृष्टीने नियोजन करा. गरज भासल्यास मदत मागण्याची लाज वाटू देऊ नका. ध्येयाप्रती सजग राहा. ही ध्येये प्राप्त झाल्यानंतर नवीन ध्येये ठरवा. ही प्रक्रिया निरंतर ठेवा.


स्वत:ला नीटनेटके करा : व्यस्त दैनंदिन जीवनातून वेळ काढून फायली आणि आवश्यक कागदपत्रे नीट ठेवा. संगणकावर तयार करण्यात आलेल्या फोल्डरपासून त्याची सुरुवात करा. गरजेचे फोल्डर्स एका ठिकाणी ठेवा. अनावश्यक फोल्डर काढून टाका. त्यामुळे नवीन ऊर्जा संचारेल आणि तुम्ही अधिक ताकदीने काम करू लागाल.


ध्येयनिश्चिती प्रक्रिया गांभीर्याने घ्या : 2013 मध्ये तुम्ही स्वत:ला कुठे असलेले पाहू इच्छिता याची खूणगाठ बांधा. ते नीट लिहून ठेवा म्हणजेच ध्येय निश्चित करा. त्यामध्ये कामात सुधारणा करणे, पदोन्नती मिळवणे, नोकरी बदलणे किंवा एखाद्या नव्या क्षेत्रात प्रवेश करणे यापैकी काहीही असू शकते. जे साध्य करता येतील अशीच ध्येये ठरवा. त्यामुळेच ध्येयनिश्चितीची प्रक्रिया गांभीर्याने घ्या.


इंटरनेटची मदत घ्या : तुम्हाला कामात रस वाटू लागला आहे व त्यातच पुढे जाण्याची तुमची इच्छा असेल तर तुमचे कौशल्य अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न सातत्याने करा. कार्यालयातील अन्य कर्मचा-यांपेक्षा उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी प्रशिक्षण घ्या, तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करा, वर्कफोर्स डेव्हलपमेंट समजून घ्या. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या कौशल्यात सुधारणा घडवून आणू शकता.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: keep possible aim for success
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext