Home »Editorial »Columns» Maharashtra Politics

कुजबुज : पवारांचा सोयीस्करपणा की...

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 02:00 AM IST

‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग पुण्यातला बालगंधर्व रंगमंदिरात होता. त्याच वेळी भरत नाट्यमंदिरात असलेल्या दुस-या नाटकाला उपस्थित राहण्याचा शब्द यशवंतराव चव्हाण यांनी दिला होता. परंतु ऐनवेळी माझ्या विनंतीवरून चव्हाण साहेबांनी ‘घाशीराम’ला जाण्याचा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवार यांनी बारामतीच्या नाट्यसंमेलनात सांगितली. परंतु यशवंतरावांना ‘घाशीराम’च्या प्रयोगाला त्या वेळी उल्हासदादा पवार घेऊन गेले होते. शरद पवार नव्हे, अशी कुजबुज जाणकार नाट्यरसिकांमध्ये रंगली. एवढेच काय, त्या वेळी उपस्थित असलेल्या काहींची साक्षही काढली गेली. पवार अलीकडे त्यांना हवे ते ठोकून देतात. राजकीय श्रेष्ठत्व आणि वयाचा गैरफायदा घेत पवार सोयीस्कर बोलतात वगैरे शेलक्या पुणेरी प्रतिक्रियाही नाट्यरसिकांच्या कट्ट्यावर उमटल्या.

Next Article

Recommended