Home »International »Bhaskar Gyan» Interesting Facts About Turkey Presidential Palace

नुसते वीज बिल येते 4 कोटी रूपये, इतका अलिशान आहे हा 1100 रूम्सचा पॅलेस

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 15:10 PM IST

  • तुर्की प्रेसिडेंटचा पॅलेस...
इंटरनॅशनल डेस्क- तुर्कीतील राष्ट्राध्यक्ष शासन प्रणाली आणण्याच्या जनमत चाचणीत प्रेसिडेंट रेचेप तेयप एर्दोयान यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एर्दोयान आता 2029 पर्यंत प्रेसिडेंट राहू शकतात. सुमारे 99.45 टक्के मतमोजणीत त्यांना 51.37 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले आहे. तर विरोधी नेत्याला सुमारे 48.63 टक्के लोकांचे मतदान मिळाले आहे. तैयप तुर्कीचा सर्वात लोकप्रिय नेता आहेत. याशिवाय ते आपल्या लग्झरी लाईफ स्टाईलसाठीही ओळखले जातात. जगातील सर्वात मोठ्या व अलिशान पॅलेसमध्ये राहतात तेयप...
- तुर्की मीडियानुसार, प्रेसिडेंट तेयप यांचा ‘अक-सराय’ पॅलेस सुमारे 4 हजार कोटी रूपयांचा आहे.
- पॅलेसचे ओपनिंग 2013 मध्ये झाले होते. ही अमेरिकेच्या प्रेसिडेंशियल हाउस ‘व्हाईट हाऊस’ पेक्षा 30 पट मोठा आहे.
- पॅलेसमध्ये डझनावरी स्पा, स्वीमिंग पूल, बाथरूम आणि स्टीम रूम आहेत. अशा या अलिशान पॅलेसचे नुसते वीज बिल महिन्याला चार कोटी रूपये येते.
- पॅलेसमध्ये 1100 खोल्या आहेत. ज्यात 250 रूम फक्त प्रेसिडेंट आणि त्यांच्या परिवारासाठी आहेत. इतर रूम पाहुणे, बॉडीगार्डस आणि पॅलेसमधील कर्मचा-यांसाठी आहेत.
- पॅलेसमधील सर्व फ्लोरला जगभरातील महागात महाग मार्बल्स लावल्या गेल्या आहेत.
- याशिवाय पाहुण्यांच्या स्वागतासाठी पॅलेसमध्ये रेड कार्पेट लावले आहे.
- पॅलेसमध्ये 57 कोटी रुपयांचे रेड कार्पेट अंथारले आहे. पॅलेसच्या प्रत्येक रूमचा दरवाजा 10 फूट ऊंचीचा आहे.
- 2 लाख स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला ‘अक-सराय’ हा जगातील सर्वात मोठा पॅलेस मानला जातो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ‘अक-सराय’ पॅलेसमधील फोटोज...

Next Article

Recommended