Home »International »Bhaskar Gyan» Russian Model Ekaterina Lisina With Worlds Longest Legs Breaks Guinness Record

OMG: जगातील सर्वात लांब पाय असणारी मॉडेल पहाल तर तोंडात बोटं घालाल

दिव्यमराठी वेब टीम | Sep 14, 2017, 11:33 AM IST

  • Titleरशियाची 29 वर्षीय एकॅटेरियन लिसिना ही मॉडेल जगातील सर्वात लांब पायाची मॉडेल ठरली आहे.
इंटरनॅशनल डेस्क-रशियाची 29 वर्षीय एकॅटेरियन लिसिना ही मॉडेल जगातील सर्वात लांब पायाची मॉडेल ठरली आहे. नुकतेच तिच्या लांब पायामुळे तिची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. लिसीनाच्या पायाची लांबी तब्बल 132 सेंमी इतकी आहे. लिसीनाच्या नावावर याआधीच सर्वात ऊंच मॉडेल असण्याचा गिनीज बुकमध्ये विक्रम आहे. गिनीज बुकच्या अधिका-यांनी नुकतेच लिसीनाच्या पायांचे मोजमाप केले. यात लिसीनाचा डावा पाय 132. 8 सेंमी (52.2 इंच) ऊंच तर उजवा पाय 132. 2 (52 इंच) सेंमी ऊंच भरला. 85 किलो वजन असूनही लिसीना एकदम सडपातळ दिसते.
लिसीनाची ऊंची 6 फूट 9 इंचाच्या घरात आहेत. यासोबतच लिसीनाची आणखी एक ठळक जागतिक ओळख म्हणजे ती बॉस्केटबॉल खेळाडू राहिले आहे. एवढेच नव्हे तर 2008 साली चीनमधील बिजींग शहरात झालेल्या ऑलिंपिकमध्ये तिने ब्रॉंझ मेडल जिंकले होते. लिसीनाच्या नावावर आता दोन गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवले गेले आहेत.
लिसीना सांगते, जेव्हा मी 15-16 वर्षाची होते तेव्हा माझी खूपच ऊंची वाढली. माझ्या तुलनेत माझे मित्र-मैत्रिणी कमी ऊंचीच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकदा मला टोमणे ऐकावे लागले तर कधी टीका सहन करावी लागली. त्याकाळी मला राग यायचा. पण आता मी माझी ऊंची खूप एन्जॉय करते. जगातील सर्वात ऊंच व लांब पायाची मॉडेल बनल्याचा मला अभिमान व गर्व वाटतो. लोक आता माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपडतात.
असे असले तरी लिसीनाला या ऊंचीची अनेकदा अडचण होते. जसे कारमध्ये बसताना किंवा विमानात बसताना. कारण तिला तेथे जागा पुरत नाही. एवढेच नव्हे तर तिला कपडे व शूज सामान्य साईजमधील बसत नाहीत. तिला शूज 47 नंबरचा लागतो तर कपडे तिला खास डिझायनरकडून बनवून घ्यावी लागतात.
मात्र, या उंचीच्या त्रासापेक्षा लिसीनाने त्याचे फायदे उचललेले दिसत आहेत. जसे गिनीज बुकमध्ये तिच्या नावावर दोन विश्वविक्रम आहेत. याशिवाय ऊंच टांगा असल्यामुळे उडी मारून गोल करता येतो असा बॉस्केटबॉलमध्ये तिने प्राविण्य मिळवले. त्यावर कडी म्हणजे ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकही जिंकले. याशिवाय गेली अनेक वर्षे ती यशस्वी मॉडेल म्हणून कार्यरत आहे.
लिसीनाने सर्वात लांब पायाचा विक्रम नोंदवताना आपल्या देशाच्या स्वेतलाना पॅन्क्रोतवा हिचा विक्रम मोडला. स्वेतलानाच्या पायाची टांग जवळपास 132 सेंमी इतकी लांब होती. मात्र, लिसीनाने तिला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जगभरातील महिलांची सरासरी उंची 5 फूट 10 इंचच्या घरात असते. पण लिसिना याला अपवाद आहे. याचे कारण तिचे संपूर्ण कुटुंबच उंचच्या उंच आहे. लिसीनाचा भाऊ 6 फूट 6 इंच उंच, पिता 6 फूट 5 इंच उंच तर आई 6 फूट उंच आहे. लिसीनाने आई- वडिल व भावालाही मागे टाकले आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहाच, एकॅटेरियन लिसिनाचे कसे आहेत लांबच लांब पाय...
(PHOTO SOURCE-Ekaterina Lisina Instagram account)

Next Article

Recommended