Home »International »China» China Demonstrates Power, Ballistic Missile Also Seen In Parade Doklam

डोकलाम वादानंतर भारताला इशारा देण्यासाठी चीनचे शक्तीप्रदर्शन, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Aug 07, 2017, 15:32 PM IST

  • मंगोलिया स्थित चीनच्या सर्वात मोठ्या मिलिट्री बेसवर चीन आर्मीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत भारताला एक प्रकारे इशाराच दिला आहे.
इंटरनॅशनल डेस्क - चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आज 90 वा वर्धापन दिन चीन साजरा करत आहे. चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्‍कराला युध्‍द जिंकण्‍यासाठी तयार राहण्‍याचे आदेश दिले आहे. सिक्कीमच्या डोकलाममध्ये भारताशी तणातणी सुरू असतानाच चिनी लष्कराने रविवारी शक्तिप्रदर्शन केले. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगोलियाच्या वाळवंटातील झुरिह या लष्करी तळावर मोठे संचलन झाले.
लष्करी गणवेशात सैन्याला संबोधित करताना राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले. ते म्हणाले की, पीएलए कोणत्याही हल्लेखोर शत्रूला हरवण्यास सक्षम आहे. जिनपिंग यांनी भारताचे नाव घेतले नाही. मात्र, चीनची सरकारी माध्यमे आणि प्रवक्ता भारतावर डोकलाममध्ये घुसखोरीचा आरोप करत आहेत. दरम्यान, आजच्या आयोजनाचे या भागाच्या परिस्थितीशी काहीही देणेघेणे नाही, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. डोकलामच्या पार्श्वभूमीवर चीनचे जोरदार शक्तिप्रदर्शन...
- चिनी लष्कराची ही कवायत लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. चिनी माध्यमांनुसार, 1949 च्या कम्युनिस्ट आंदोलनानंतर पहिल्यांदाच 1 ऑगस्टला साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या आधी चीनने लष्करी ताकद दाखवली आहे.
- तोफा, गाड्यांवर तैनात अण्वस्त्रे, लढाऊ विमानांपासून अत्याधुनिक जे-20 स्टील्थ विमानांसहित 571 प्रकारची शस्त्रास्त्रे संचलनात सहभागी होती.
- कार्यक्रमादरम्यान 129 लढाऊ विमानांनीही उड्डाण केले. जिनपिंग यांनी खुल्या जीपमध्ये 12 हजारपेक्षा जास्त सैनिकांच्या तुकड्यांचे निरीक्षण केले.
- एक हजार किलोमीटमध्ये विस्तार असलेला झुरिहस्थित हा लष्करी तळ आशियातील सर्वात मोठे लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे.
- तेथे अनेक मोठे लष्करी सराव झाले आहेत. डोकलाममध्ये तणाव असून त्या पार्श्वभूमीवर चीनने शक्तिप्रदर्शन केले.
चिनी लष्कर कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणात-
- चीनच्या लष्कराला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणतात. त्याची स्थापना 1 ऑगस्ट 1927 ला झाली होती. ते चिनी सरकारऐवजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनच्या अधिपत्याखाली काम करते.
- सध्या त्यात सुमारे 23 लाख सैनिक आहेत. हे जगातील सर्वात मोठे लष्कर आहे.
पारंपरिक आणि अण्वस्त्रांचेही प्रदर्शन-
- चिनी लष्कराच्या संचलनात स्वदेशी पारंपरिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांच्या पाच प्रतिकृती दाखवल्या गेल्या.
- त्यात अगदी कमी काळात डागता येणारे आणि अण्वस्त्रांनी सज्ज असलेले डोंगफेंह 26 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, कॅरिअर किलर नावाने चर्चित डोंगफेंग 21 डीही सहभागी होते.
- संचलनात चीनचे नवे जे 20 लढाऊ विमान प्रथमच सहभागी झाले.
पीएलएने शांतता प्रस्थापित करावी : जिनपिंग
- जिनपिंग आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात म्हणाले की, जगात कुठेही शांतता नाही. चिनी लष्कराने शांतता प्रस्थापनेसाठी काम करावे.
- लष्कराने आणखी सुधारणा आणि आधुनिकीकरण करावे. अधिकारी आणि सैनिकांनी लष्करावर कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाचे मौलिक सिद्धांत आणि व्यवस्था याबाबत ठाम राहावे. नेहमी पक्षाचा आदेश माना.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मंगोलिया स्थित चीनच्या सर्वात मोठ्या मिलिट्री बेसवर चीन आर्मीचे टिपलेली फोटोज...

Next Article

Recommended