Home »International »Other Country» Foreigners Have Indias Kohinoor And Other Things

'कोहिनूर'च नव्हे, भगवान विष्णूचा 'हिर्‍याचा डोळा'ही पळवलाय ब्रिटिशांनी

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 16:12 PM IST

इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनच्या ताब्यात असलेला कोहिनूर हा हिरा भारतात परत आणण्यास किंवा त्याचा होणारा संभाव्य लिलाव रोखण्याबाबत कोणतेही आदेश देण्यास शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. चीफ जस्टिस जे एस खेहर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, "आम्ही याबाबत कोणताही आदेश देऊ शकत नाही. कोहिनूर हिरा हा सध्या ब्रिटनच्या ताब्यात आहे. त्यामुळे आम्ही त्याबाबत लिलाव रद्द करण्याचा किंवा भारतात आणण्यासारखे कोणतेही आदेश देऊ शकत नाही. तसेच यापुढे कोहिनूरबाबत कोर्टात सुनावणी घेतली जाणार नसल्याचे सांगितले.
जगातील सर्वात मोठा हिरा म्हणून ज्याचा लौकिक होता किंवा आहे तो म्हणजे 'कोहिनूर'. आज कोहिनूर हिरा भारतात परत आणण्‍याच्या मुद्द्यावरून भारतात वारंवार मागणी होत असते. केंद्र सरकारने कोहिनूर हिरा मायदेशात परत आणण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही. मात्र, कोहिनूरबाबतही काही देशांनी दावा केल्याने तो एक वेगळाच वादाचा विषय ठरत आहे. कोहिनूरवर भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणने दावा केला आहे. पण तुम्हाला माहीत आहे काय? कोहिनूर हिर्‍यासह धारच्या सरस्वतीच्या मूर्तीसह अनेक अमुल्य वस्तू आजही विदेशात आहेत. त्या भारतात परत आणण्यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे.
कोहिनूर हिर्‍याशी संबंधित महत्त्वपूर्ण फॅक्ट्‍स...
- कोहिनूर हिऱ्याला मोठा इतिहास असून तो ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याच्या आधी पंजाबचे महाराज रणजितसिंग यांच्याकडे होता. हिर्‍याचे सध्याचे वजन 105 कॅरेट असून आजमितीला त्याची किंमत 100 दशलक्ष पौंड इतकी आहे.
- महाराज रणजितसिंग यांचे 1839 मध्ये निधन झाल्यानंतर दुलिपसिंग गादीवर आले. त्यांच्याच काळात कोहिनूर हिरा आपल्याला भेट मिळाल्याचे दाखवून ईस्ट इंडिया कंपनीने तो इंग्लंडला नेला.
- इंग्लंडच्या महाराणीच्या राजमुकुटात कोहिनूर हिरा बसवण्यात आला. हा राजमुकुट इंग्लंडच्या महाराणीच्या बकिंगहॅम राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे.
-कोहिनूर हिरा ब्रिटिशांनी चोरून नेला असून तो इंग्लंडने आता भारताला परत करावा या मागणीसाठी "माउंटन ऑफ लाइट' या भारतीयांनी स्थापन केलेल्या गटाने इंग्लंडच्या महाराणीवर लंडनच्या उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी चालविली आहे.
- त्यांच्या या मोहिमेला अनेक भारतीय उद्योजक तसेच बॉलीवूडमधील काही कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे.
- ब्रिटिशांनी कोहिनूरच हिराच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार व असंख्य मौल्यवान वस्तू आपल्या देशात नेल्या. ही दुसरेतिसरे काही नसून भारतीय संपत्तीची लूटच होती.
- बकिंगहॅम राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी जोरदार प्रयत्न केले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, कोहिनूरसह भारताच्या कोणत्या अमुल्य वस्तू आहेत विदेशात?

Next Article

Recommended