Home »International »Other Country» Indonesian Tribes Dig Up Corpse Of Their Relative In Bizarre Festival

दरवर्षी कब्रींमधून काढले जातात मृतदेह, गावात फिरवून काढतात Selfie

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 00:00 AM IST

सुलावेसी -इंडोनेशियातील साउथ सुलावेसी येथे एका गावात गेल्या कित्येक शतकांपासून एक अजब परमपरा पाळली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या 'हार्वेस्ट फेस्टिव्हल' मध्ये कब्रींमधून मृतदेह बाहेर काढले जातात. यानंतर त्यांना जीवंत माणसाप्रमाणे आंघोळ घालून स्वच्छ केले जाते. यानंतर चांगले कपडे घालून गावभर त्यांना फिरवले जाते.

अशी आहे प्रथा...
- तोराजा नामक गावात मृतांना थेट नाही, तर शवपेटीमध्ये ठेवून पुरले जाते.
- येथे मृतदेह शवपेट्यांमध्ये टाकून गुहांमध्ये ठेवले जातात. किंवा शवपेट्या उंच डोंगराळ ठिकाणी टांगल्या जातात.
- लहान मुलांचे मृतदेह सुद्धा शवपेटीत ठेवून झाडांवर टांगण्याची परमपरा आहे.
- दरवर्षी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या शवपेट्या सुद्धा दुरुस्त केल्या जातात.
- यानंतर ठराविक मार्गावर समस्त गावकरी आप-आपल्या नातेवाइकांचे, पूर्वजांचे मृतदेह टेहळणीसाठी घेऊन जातात.
- दरवर्षी होणाऱ्या या प्रथेला स्थानिक भाषेत 'माईनेने' असे म्हटले जाते.

आत्मा परत येत असल्याची आस्था
तोराजा गावातील मृतांची आत्मा त्यांच्या मूळ गावीच येत असल्याची ग्रामस्थांची आस्था आहे. त्यामुळेच, गावातील एखादी व्यक्ती प्रवासात इतर ठिकाणी दगावली असेल तरीही त्याचे नातेवाइक तेथे जाऊन मृतदेह घेऊन येतात. गावाबाहेर गेल्यानंतर मृत्यू झाल्यास आपल्या आत्म्याला गावी परतणे कठिण होईल अशी भिती या गावकऱ्यांना आहे. त्यामुळे, हे लोक क्वचितच दुसऱ्या ठिकाणी प्रवासाला जातात. प्रवास करण्याच्या प्रमाण सद्यस्थितीला वाढले तरीही गावातील अनेकांच्या मनात ही भिती कायम आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अजब परमपरेचे फोटोस...

Next Article

Recommended