Home »International »Other Country» Irma Weakened To A Tropical Storm On Monday

PHOTOS: अमेरिकेत तांडव करून निघून गेला इरमा, केले शहरांचे असे हाल

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 14:27 PM IST

फ्लोरिडा - अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात महाप्रलयकारी इरमा चक्रीवादळाने 24 तास धुमाकूळ घातला. दुसऱ्या दिवशी याची तीव्रता कमी झाली. इरमाच्या 24 तासांच्या तांडवात झालेल्या जीवित आणि वित्तहानीची आकडेवारी गोळा केली जात आहे. अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. फ्लोरिडा प्रांतात या वादळाने 5 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. याच प्रांतात इरमाच्या प्रलयामुळे 40 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

बेटांवरील 90% बांधकाम उद्ध्वस्त...
- सुरुवातीला कॅटेगरी 5 चे चक्रीवादळ कॅरेबियन बेटांवर ताशी 297 किमी वेगाने धडकले होते.
- यात बारबुडा, अॅन्टीगुआ, सेंट मार्टीन, पोर्टा रिका अशा बेटांवरील 90% बांधकाम वाऱ्यासह उडून गेले.
- क्युबा आणि हैतीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. प्राथमिक आकडेवारीनुसार, अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
- फ्लोरिडात ज्या शहरांमध्ये इरमा धडकले होते, तेथे दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरूच होता.
- वीजेचे खांब जमीनीवर पडल्याने अनेक भागांमध्ये अजुनही वीज पुरवठा खंडित आहे.
- ठिक-ठिकाणी बचाव आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. घरे सोडून गेलेल्यांना अद्याप आपल्या शहरात परतण्याचे आदेश नाहीत.

पुढील स्लाइड्सवर पाहा... फ्लोरिडा व इतर ठिकाणी इरमाच्या प्रलयाचे PHOTOS...

Next Article

Recommended