Home »International »Other Country» See Dubai Beatiful Photos

AMAZING : या फोटोतून करा सर्वात श्रीमंत शहर असलेल्या दुबईची सफर

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 10:12 AM IST

इंटरनॅशनल डेस्क- जगामध्ये सर्वात धनाढ्य देश म्हणून ओळखले जाणारे दुबई म्हणजे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. आज दुबईमध्ये सर्व काही शक्य आहे. अत्यंत उष्ण वाळवंटात असलेला हा देश आज जगातील सर्वात उच्च सुख सुविधा देतो. येथे पैशाला कमी नाही आणि पैसे खर्चायलाही. वाळवंटात असूनही येथे तुम्ही वर्षाच्या 12 ही महिने बर्फाचा आनंद घेऊ शकता, तेथे स्की करू शकता. तर इग्लू प्रमाणे बर्फाच्या घरात ड्रिंक्सचा आनंद घेऊ शकता. येथे जगातील सर्वात मोठे अक्वेरियम आहे. तर जगातील सर्वात महागड्या कार येथे धूळ खात पडलेल्या आहेत. सोन्याच्या, हिऱ्यांच्या कार रस्त्यावरून धावतात तर सिंहाची सवारी करणारेही काही लोक येथे पाहायला मिळतात. जगातील सर्वात मोठी इमारत, मॉल, विमानतळ, एवढंच काय तर समुद्रावर मानवनिर्मित दोन सर्वात मोठे आयसलँड तयार करणारा हा देश संपूर्ण जगासाठी एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.
आज आम्ही तुम्हाला 41 फोटोंमध्ये या देशाची सफर घडवून आणणार आहोत. हे फोटो पाहाताच तुम्हाला या देशाच्या श्रीमंतीचा अंदाज येईल.. मग तयार आहात ना... दुबईच्या सफरीला..
पुढील 40 स्लाईडमध्ये पाहा, दुबईमधील चित्रविचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टींचे फोटो....

Next Article

Recommended