Home »International »Other Country» Afzal Guru Hanged In International Media

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली अफजलच्या फाशीची दखल

दिव्य मराठी वेब टीम | Feb 09, 2013, 16:08 PM IST

मुंबईवर हल्ला करणारा एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकविल्यानंतर संसदेवर हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरुला फाशी केव्हा होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. तिहार जेलमध्ये आज सकाळी (९ फेब्रुवारी) अफजल गुरुला फासावर लटकवून, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार काहीही न बोलता दिली आहेत.

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड भारतीय नागरिक अफजल गुरु होता. या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांसह १२ जण ठार झाले होते. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना होत्या.

अफजलला आज सकाळी फाशी दिल्यानंतर देशातील माध्यमांमध्ये ती मुख्य बातमी होती. त्याचबरोबर जगभरातील माध्यमांमध्येही अफजलच्या फाशीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. divyamarathi.comआपल्या वाचकांना जागतिक मीडियाने अफजलच्या फाशीचे कव्हरेज कसे दिले याची माहिती देत आहे.

Next Article

Recommended