finmeccnecka postpond its financial result

Home »International »Other Country» Finmeccnecka Postpond Its Financial Result

फिनमेकॅनिका फर्मने पुढे ढकले आर्थिक निकाल

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 09:04 AM IST

  • फिनमेकॅनिका फर्मने पुढे ढकले आर्थिक निकाल


लंडन - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात फिनमेकॅनिका फर्मने सावध पवित्रा घेतला आहे. 2012 चे कंपनीचे वार्षिक निकाल पुढे ढकलले. त्याचबरोबर 3600 कोटी रुपयांच्या या सौद्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या निगराणी मंडळाचा विस्तार केला. मंडळावरील सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. उपाध्यक्ष अ‍ॅडमिरल गिडो वेंटुरोनी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंडळाची बैठक झाली होती. त्यामुळे निगराणी मंडळावरील संचालकांची संख्या पाचपर्यंत नेण्याचा निर्णय झाला आहे. काही नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक अहवालविषयक निकाल जाहीर करण्यापूर्वी मार्चच्या शेवटी किंवा 30 एप्रिलला बैठक होण्याची शक्यता आहे. 12 हेलिकॉप्टरसाठी 3600 कोटी रुपयांचा हा करार होता. सौद्यासाठी 362 कोटी रुपयांची दलाली घेण्यात आल्याचा आरोप आहे.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: finmeccnecka postpond its financial result
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext