Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Here Is How To Donate The Martyrs Directly

शहीद जवानांच्या कुटुंबियांना अशी करा थेट मदत, गृहमंत्रालयाची ऑनलाईन मोहिम...

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 16:10 PM IST

औरंगाबाद - देशांतर्गत आणि बाहेरील संकटांपासून अहोरात्र तुमचे-आमचे संरक्षण करताना दर चौथ्या दिवशी एक जवान शहीद होतो. तसेच एक जवान हात किंवा पाय गमावत असल्याची आकडेवारी आहे. जम्मू काश्मिर, छत्तिसगड आणि ईशान्य भारतासह विविध ठिकाणी दहशतवादी आणि नक्षल्यांच्या हातून हुतात्मा होणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांसाठी गृह मंत्रालयाने एक मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये सरकारने एक ऑनलाईन वेब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कुणालाही हवे तेव्हा शहीदांच्या कुटुंबियांना मदत करता येईल. ही मदत थेट त्या जवानांच्या वारसदारांना वळती केली जाणार आहे. या संकेतस्थळावर शहीदांचा तपशील आणि त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम सुद्धा पाहता येऊ शकते.

10 रुपये सुद्धा जमा करू शकता
'भारत के वीर' वेबसाईटवर जाऊन आपणही आपल्या खात्यातून थेट शहीदांच्या कुटुंबियांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकता. यात अगदी 10 रुपये सुद्धा जमा करणे शक्य आहे. एकूणच या निधीमध्ये दान करणाऱ्यांना कमाल 15 लाख रुपये जमा करता येऊ शकतील. तर जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांपर्यंतची कमाल मर्यादा आहे. दान करताना कमाल रक्कमेची मर्यादा ओलांडल्यास वेबसाईट अथवा पोर्टलवरून तसा मेसेज दिला जाईल.
(आताच थेट रक्कम दान करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशी आहे प्रक्रिया....
- वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक होमपेजवर काही ऑपशन्स दिसतील. त्यापैकी Bravehearts यावर क्लिक केल्यास देशभरातील शहीद जवानांची यादी दिसेल. याला नाव, राज्य, दल, शहीद झालेले ठिकाण आणि तारखेनुसार शहीद जवानाची माहिती शोधता येते.
- एखाद्या जवानाला निधी देण्यासाठी अशाच पद्धतीने शोधून त्याच्या फोटोवर क्लिक करावे लागणार आहे. शहीद जवानाचा फोटो ओपन झाल्यानंतर त्या जवानाची सविस्तर माहिती दिसेल. त्याच फोटोच्या बाजूला 'I would like to contribute' असे ऑपशनला क्लिक करून पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते.
- यानंतर एक नवीन विन्डो ओपन होईल. त्यावर निर्देशानुसार नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाकून ओटीपीने ते कन्फर्म करावे लागेल.
- एकदा माहिती खरी असल्याचे कन्फर्म झाल्यास तुम्हाला एक लिंक आणि बँक खात्याची माहिती शेअर केली जाईल. त्यावरून तुम्ही आपल्या मनाने 15 लाखांच्या आत दान करू शकता.

शहीदची परीपूर्ण माहिती
या संकेतस्थळावर शहीद जवानांचा राज्यनिहाय तपशील देण्यात आला आहे. त्यामध्ये शहीदाचे नाव, कुठे आणि कसे शहीद झाले, त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम आणि त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 वीर पुत्रांचा उल्लेख आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा... महाराष्ट्रातील शहीदांचा तपशील....

Next Article

Recommended