Home »Maharashtra »Mumbai» Inside Photos Of Mukesh Ambanis House Antillia

आतून असे दिसते मुकेश अंबानींचे घर, हेलिपॅडपासून ते थिएटरपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 15:32 PM IST

मुंबई :देशातील सर्वात मोठे इंडस्ट्रियलिस्ट मुकेश अंबानी ज्या घरामध्ये राहता ते घर जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये समाविष्ट आहे. फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी जगातील श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये 33 व्या स्थानावर आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्ती 23.२ अब्ज डॉलर सांगितली जाते. ते आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांचे घर 'एंटीलिया'विषयी खास माहिती देत आहोत.

घरामध्ये काम करतात 600 लोक
- हे आलिशान घर मुंबईतील आल्टामाऊंट रस्त्यावर उभे आहे. घराची किंमत सुमारे 1 बिलियन डॉलर आहे. म्हणजेच 55 अब्ज रुपये. या घराचे नाव एका प्राचीन द्वीप यावरुन एंटिलिया ठेवण्यात आले आहे. घरात सिनेमागृहासह अनेक अद्ययावत सुविधा आहेत.
- मुकेश अंबानी त्यांची पत्नी, तीन मुले आणि 600 कर्माचा-यांची या या महागड्या घरात राहण्याची सोय करण्यात आली आहे.
या आलिशान महालात 160 वाहनांसाठी अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था आहे.
- जुन्या आणि नवीन वास्तुशैलींचा संगम ‘अँटिला’च्या बांधकामात साधण्यात आला आहे.
- एक खासगी चित्रपटगृह, हेल्थ क्लब, बॉलरूम, गेस्ट हाऊस, बगिचा, स्वीमिंग पूल, स्टुडिओसाठी वेगवेगळे मजले तयार करण्यात आले आहेत. या इमारतीत तीन हेलिपॅड आणि मल्टिपार्किंगचीही सुविधा आहे.

आकाशाला भिडणार्‍या 'एंटीलिया'चे आतील फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

Next Article

Recommended