jalgaon patsanstha problem

Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Jalgaon Patsanstha Problem

जिल्ह्यात 19 पतसंस्था गुंडाळण्याची तयारी

प्रतिनिधी | Apr 22, 2012, 09:21 AM IST

  • जिल्ह्यात 19 पतसंस्था गुंडाळण्याची तयारी

जळगाव - पतसंस्थांवरील कारवाईला सहकार विभागातर्फे सुरुवात करण्यात आली आहे. भुसावळ येथील 34 संस्थांवर कारवाईचे संकेत सहकार आयुक्तांनी गेल्या शनिवारी दिले होते. इतर अवसायनातील संस्थांवरदेखील त्यांचे व्यवहार गुंडाळून नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. याबाबत शनिवारी जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस काढली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या संस्थामध्ये महात्मा ज्योतिबा नागरी पतसंस्था, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रेडिट सोसायटी, संघमित्र जिल्हा परिषद वाहन धारकांची गृहनिर्माण सोसायटी, शिवछत्रपती जनता नागरी सोसायटी, कुसुमलक्ष्मी नागरी संस्था, शरदचंद्रजी पवार नागरी पतसंस्था, चत्रभूज नागरी संस्था, आर.टी. अण्णा चौधरी पतसंस्था, माता मनुदेवी अर्बन सोसायटी, स्वराज नागरी पतसंस्था, सर्वोदय पतसंस्था, शिवाजी महाराज पतसंस्था, गणेश ग्रामीण बिगरशेती सहकार संस्था, जळगाव प्रीमिअर अर्बन को-ऑफ सोसायटी, गंगाराम नागरी सोसायटी, स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, जळगाव खुर्द ग्रामीण बिगरशेती संस्था, जळगाव बागवान अर्बन को-अर्बन सोसायटी आदी संस्थांचा समावेश आहे. या संस्थामधील व्यवहार गुंढाळून त्यांच्या मान्यता रद्द करण्यात येईल.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: jalgaon patsanstha problem
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext