Home »Maharashtra »Mumbai» Medical Student Commits Suicide By Hanging Herself In Hostel

मित्राला व्हॉट्‍सअॅपवर मेसेज पाठवून मेडिकलच्या विद्यार्थिनीची मुंबईत आत्महत्या

दिव्य मराठी वेब टी | Sep 13, 2017, 20:10 PM IST

मुंबई- नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाग्यलक्ष्मी मुठा (वय-20,रा. इचलकरंजी, जि.कोल्हापूर) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्या करण्‍यापूर्वी भाग्यलक्ष्मीने मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. मित्राने भाग्यलक्ष्मीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिने ऐकले नाही.

रूममेटला भाग्यलक्ष्मी दिसली पंख्याला लटकलेल्या अवस्थेत ...
- भाग्यलक्ष्मी मुठा ही नायर मेडिकल डेंटल कॉलेजमध्ये व्दितिय वर्षाची विद्यार्थिनी होती.
- काल (मंगळवारी) दुपारी तिने हॉस्टेलमध्ये तिच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
- त्यापूर्वी तिने मित्राला हॉट्‍सअॅपवर मेसेज पाठवला होता.
- मित्राने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिने त्याचे ऐकले नाही. अखेर दुपारी एक वाजता तिने खोलीत गळफास लावून जीवनप्रवास संपवला.
- रुममेट आल्यानंतर भाग्यलक्ष्मी तिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिेसली. तिने तत्काळ वार्डनला याबाबत माहिती दिली.
- भाग्यलक्ष्मी हिला केइएम हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या कारणामुळे भाग्यलक्ष्मीने उचलले टोकाचे पाऊल...
- भाग्यलक्ष्मीला बीडीएसचे शिक्षण कठीण वाटत होते. त्यामुळे ती मागील काही महिन्यांपासून त्रस्त होती.
- मेडिकलचे शिक्षण अर्ध्यात सोडले तर आई-वडीलांना कमीपणा वाटेल, अशी भीतीही तिला वाटत होती.
- तिने रेडिओलॉजीचे शिक्षण घेणार्‍या मित्राला मेसेज पाठवून सिलॅबस कठीण वाटत असल्याचे सांगितले होते.
- 'आई-वडील माझ्या शिक्षणावर खूप पैसा खर्च करत आहेत. मी प्रचंड हताश असून आत्महत्या करत आहे.' असे तिने मेसेजमध्ये म्हटले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... भाग्यलक्ष्मी मुठा हिचे निवडक फोटोज...

Next Article

Recommended