Home »National »Other State» Bruna Abdullah Interview To Dainik Bhaskar

Topless अन् Bold फोटोशूट केलेली ही अॅक्ट्रेस म्हणाली, मी खूप लाजाळू आहे...

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 10:02 AM IST

लखनऊ - टॉपलेस आणि बोल्ड फोटोशूट केलेली ही ब्राझीलियन अॅक्ट्रेस ब्रुना अब्दुल्लाह म्हणते की, मी अनेक बोल्ड शूट केले आहेत, पण मी खूप लाजाळू आहे. इंडियन ग्रामीण क्रिकेट लीगच्या निरोप समारंभाला शुक्रवारी ती लखनऊमध्ये आली होती. यानिमित्त तिने divyamarathi.com शी पर्सनल लाइफबाबत काही गोष्टी शेअर केल्या.
बँकेत जॉब करायची, असे सुरू झाले अॅक्टिंग करिअर
- ब्रुना ब्राझीलमध्ये वाढलेली आहे. ती म्हणते, मी ब्राझीलमध्ये एका बँकेत जॉब करायचे. त्या वेळी माझे वय 16 वर्षे होते. माझ्या बॉसने म्हटले की एक सौंदर्य स्पर्धा होणार आणि मला वाटते की तू त्यात पार्टिसिपेट करावे. जिंकल्यावर कॉम्प्युटर आणि कॅश मिळेल.
- मी मॉडेल टाइप नव्हते. कॅन्व्हॉस शूज, सैल जीन्स आणि टी-शर्ट घालायचे. पण माझ्या मित्रांनी आणि कलीगनी मला फोर्स केला आणि मी काँटेस्टमध्ये पार्टिसिपेट केला. तिथे मी पहिल्यांदा बिकिनी आणि हील सँडल घातली होती.
- काँटेस्ट जिंकल्यावर मला अनेक सीनियर मॉडेल्सनी त्यांच्या एजन्सीसाठी काम करण्याची ऑफर दिली. पण मला माझे शिक्षण सुरू ठेवायचे होते, म्हणून त्यांना नकार दिला.
- सहा महिन्यांनी एक कमर्शियल अॅड केली. त्याचे 1 हजार डॉलर मिळाले. ही माझ्यासाठी मोठी रक्कम होती. एका महिन्याने एका जपानी व्यक्ती मला भेटली आणि टोकियोत कमर्शियल अॅडची ऑफर मिळाली. मी कन्फ्यूज होते, पण तयार झाले.
- जेव्हा मी आईला टोकियोला जाण्याबाबत सांगितले, तेव्हा मम्मी-पप्पा दोघेही रडायला लागले. तरीही ते म्हणाले, तुझा आमच्या सावलीत राहण्यासाठी जन्म झालेला नाही. स्वत:चे अस्तित्व ओळखून नाव मोठे कर. त्यांनी मला मोटिव्हेट केले आणि मग मी घरातनं बाहेर पडले.
बॉलीवूडमध्ये अशी केली एंट्री
- बॉलीवडूच्या डेब्यूबाबत ब्रुना म्हणाली, मुंबईत येण्याच्या एक-दीड महिना आधी मी फिलिपाइन्समध्ये होते, तिथे अनेक इंडियन फ्रेंड होते. ते मला म्हणायचे की मी इंडियन वाटते. मी बॉलीवूडला ट्राय केले पाहिजे.
- मग काय मी बॅग पॅक केली आणि मुंबईची वाट धरली. येथे पहिली अॅड साडीची मिळाली. मग अशा जाहिराती करत करतच एके दिवशी डायरेक्टर पुनीत मल्होत्रांनी मला 'हेट लव्ह स्टोरी' सिनेमासाठी रोल ऑफर केला. यात माझा छोटाच पण दमदार रोल होता. त्या वेळी मला हिंदी थोडी-थोडीच यायची पण नंतर हिंदी सिनेमे पाहून पाहून एकदाची हिंदी शिकले.
- लग्नाबाबत विचारले असता ती म्हणाली की, माझा सध्या फक्त करिअरवरच फोकस आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, ग्लॅमरस ब्रुनाचे काही PHOTOS...

Next Article

Recommended