Home »National »Other State» Kodarma Police Arrested Murder Accused, Sent To Jail

भावजयीच्या प्रेमात दिराने केली हद्द पार, पतीच्या खुनामुळे सासर अन् माहेरच्यांनी केला 'हा' विचार

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 14:32 PM IST

  • सिम्बॉलिक इमेज.
कोडरमा (झारखंड) - येथे वहिनीशी प्रेमसंबंध असल्याने एका भावाने दुसऱ्याची हत्या केली. या खुनाचा आरोपी संदीप कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. संदीपने त्याचा गुन्हाही कबूल केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात तो म्हणाला, मृत विवेकानंद सावची पत्नी लक्ष्मीच्या प्रेमात मी आकंठ बुडालो होतो. या एकतर्फी प्रेमात मी काही दिवसांपूर्वीच हाताची नसही कापून घेतली होती.

दारू पाजून खड्ड्यात पुरले
- संदीपने सांगितले की, माझे प्रेम मिळवण्यासाठी, लक्ष्मीला कायमची माझी बनवण्यासाठी मी विवेकानंदला दारू पाजण्याच्या बहाण्याने जंगलात आणले. तिथे तो दारू पिऊन तर्रर्र झाल्यावर मी माझ्या जेसीबीचा ड्रायव्हर मो. शब्बीरसोबत मिळून एका खड्ड्यात त्याला पुरले.
- एसपी सुरेंद्र कुमार झा यांनी बुधवारी सांगितले की, मृताची पत्नी या खुनात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
- मृत विवेकानंद 31 ऑगस्ट रोजी रात्री 8 पासून त्याच्या दुकानातून रहस्यमय रीतीने गायब झाला होता. त्याचा मृतदेह 10 सप्टेंबर रोजी पोलिसांनी जंगलातून हस्तगत केला.
- तपासादरम्यान जेसीबी चालक शब्बीरला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतरच पूर्ण घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांत पोहोचून नातेवाइकांनी केली मारहाण
- संदीपच्या अटकेची माहिती मिळताच मृत विवेकानंदचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी संदीपला मारहाण सुरू केली. पोलिसांनी सर्वांना एका बाजूला नेऊन समज दिली.
संदीप आपल्या मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होता. यादरम्यान, तो मामेभावाच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करू लागला. याप्रकरणी मृताच्या पत्नीलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
- मृताची पत्नी लक्ष्मीदेवी म्हणाली की, संदीप अनेकदा तिच्याशी गुलूगुलू बोलायचा. तिला त्याच्यासोबत पळून जाण्याबाबतही सांगायचा. तिने याची माहिती तिच्या नवऱ्याला दिली होती. पण सर्वांना ही मजाकच वाटत राहिली.
सासरच्यांनी नाकारले, माहेरच्यांनीही ठोकरले
- मृ़त विवेकानंदच्या पत्नीची चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांना बोलावून त्यांच्या हवाली करत होते. पण वडिलांनी तिला सोबत न्यायला नकार दिला. मग पोलिसांनी गावातील प्रमुख सत्यनारायण यादव यांच्यासह तिला सासरी नेले, तर सासरच्यांनीही तिला घरात घेण्यास नकार दिला.
- यानंतर पोलिसांनी तिला परत ठाण्यात आणले. मृताच्या आईवडिलांशिवाय त्याच्या कुटुंबीयांनीही एसपींची भेट घेऊन खुनामध्ये तिचा सहभाग असल्यावरून तिच्यावरही कारवाईची मागणी केली. कुटुंबीयांचे म्हणणे होते की, खुनाचा खुलासा मृताच्या पत्नीची चौकशी झाल्यानंतर झाला आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...

Next Article

Recommended