children uses in serious crime

Home »National »Delhi» Children Uses In Serious Crime

गंभीर गुन्ह्यांत मुलांचा वापर

इंद्र वसिष्ठ | Jan 10, 2013, 02:30 AM IST

  • गंभीर गुन्ह्यांत मुलांचा वापर

नवी दिल्ली - दिल्लीत नोंदवल्या जाणा-या एकूण गुन्ह्यांपैकी एक टक्क्यापेक्षा जास्त गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही अल्पवयीन मुले अनेक प्रकारचे गुन्हे करत आहेत. गुन्हेगारांच्या काही टोळ्यांनी तर या मुलांना खासकरून हाताशी धरले आहे. कारण ही मुले पकडली गेली तर लवकर सुटतात आणि त्यांचे
रेकॉर्डही ठेवले जात नाही.

एका वरिष्ठ पोलिस अधिका-या ने सांगितले की, अल्पवयीन मुले चोरीसह, खून, बलात्कार, दरोडा आणि लूटमार असे गंभीर गुन्हे करतात. गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, ढोबळमानाने 2012 मध्ये 16 ते 18 वर्षे वयाच्या 600 मुलांचा गुन्ह्यांत सहभाग आढळून आला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचे गुन्हे किंवा त्यांचा सहभाग असल्याची अनेक प्रकरणे आहेत.त्याच्या भीतीने लोक घराला कुलूप लावून बाहेर जात नसत.

निरागसतेचा गैरफायदा
अनेक टोळ्या मुलांना खिडकी किंवा झरोक्यातून घरात सोडून चोरी करतात. मुलांवर कुणी लगेच संशय घेत नाही. बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्स चोरण्यासाठीही मुलांचा वापर होतो. लहान मुले चोरी करताना पकडली गेली तरी टोळीतील लोक त्यांना सांभाळून घेतात.

घरे पेटवणारा अल्पवयीनच
दिल्लीत सरकारी कर्मचा-या च्या घरी चोरी केल्यानंतर आग लावून दहशत पसरवणारा चोर अल्पवयीनच होता. तो अनेकदा बालसुधारगृहातून पळाला होता. नशेसाठी फ्लूइडचे सेवन करणारा संजू नावाच्या या गुन्हेगाराला 2012 मध्ये सज्ञान झाल्यानंतरच तुरुंगात पाठवता आले.

टक-टक टोळीचे कारनामे
दिल्लीतील चौकांमध्ये सिग्नलवर थांबलेल्या कारमधून चोरी करण्यासाठीही मुलांचा वापर केला जातो. मुले कारच्या मागच्या काचेवर टक-टक करतात. कारचालक मागे वळून पाहतो किंवा मुलांना पळवून लावण्यासाठी खाली उतरतो तेव्हा टोळीतील इतर लोक कारमधील किमती वस्तू घेऊन पळ काढतात. धावत्या बसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपीही अल्पवयीन आहे. गंभीर गुन्हे करणा-या ना अल्पवयीन असल्याने सूट देऊ नये, अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी बहादूरशाह जफर मार्गावरील खुनी दरवाजामध्ये मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी पकडलेल्या तरुणाने तो अल्पवयीन असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच्या हाडांची तपासणीत तो प्रौढ असल्याचे सिद्ध झाले होते.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: children uses in serious crime
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext