husband get dirvorce from wife

Home »National »Delhi» Husband Get Dirvorce From Wife

वारंवार माहेरी जाणा-या पत्नीशी घटस्फोट मंजूर

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 05:24 AM IST

  • वारंवार माहेरी जाणा-या पत्नीशी घटस्फोट मंजूर

नवी दिल्ली - पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्यामुळे वैतागलेल्या पतीने न्यायालयातून घटस्फोट घेतला. परंतु पत्नीने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्ली हायकोर्टाने सोमवारी तिची याचिका रद्दबातल ठरवली.
न्यायमूर्ती बीना बिरबल आणि प्रदीप नंदराजोगी यांच्या पीठाने हा निकाल दिला.

सुनावणीच्या वेळी पतीने सादर केलेल्या पुराव्यावरून पत्नीने त्याच्या भावना दुखावल्या, त्याचा अवमान केल्याचे स्पष्ट होते, असे पीठाने म्हटले आहे. पतीसोबत राहूनही त्याचा मानसिक छळ केला. दांपत्याचे लग्न 11 डिसेंबर 2000 रोजी झाले होते. काही वर्षेच ते सोबत राहिले. जुलै 2006 ते एप्रिल 2007 दरम्यान मुलाचा जन्म झाला. तेव्हापासून ते विभक्तच आहेत. याच आधारावर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: husband get dirvorce from wife
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext