Home »National »Other State» Hyderabad Blast

PHOTOS: तबरेजने घडविले स्फोट?, डॉक्‍टरचा मुलगा फार्मसी सोडून दहशतवादी बनला

दिव्य मराठी वेब टीम | Feb 22, 2013, 18:01 PM IST

हैदराबाद- हैदराबादमध्ये दिलसुखनगर भागात गुरुवारी सायंकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. त्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडे संशयाची सुई आहे. याबाबत सांगितले जात आहे की, अफझल गुरुची फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले असावेत.

आझमगढ पुन्हा निशाण्यावर-हैदराबादमधील दिलसुखनगर भागात बॉम्बस्फोट झाल्यानंतर पहिली नजर उत्तरप्रदेशमधील आझमगढकडे गेली आहे. याबाबत वृत्त आले आहे की, बॉम्बस्फोट करणा-यामध्ये तीन संशयित युवक आझमगढमधील आहेत ज्यातील एकाचे नाव तबरेज ऊर्फ डॅनियल असल्याचे सांगण्यात येते.

तबरेजचे नाव पुढे येताच यूपी एटीएस त्याबाबत पुरावे मिळवण्याच्या तयारीत गुंतली आहे. त्यासाठी एक टीम शुक्रवारी सकाळी आझमगढमध्ये पोहचली आहे. एटीएस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन भटकळसोबत तबरेजने 2011 मध्ये मुंबई आणि 2012 मध्ये पुणे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यास मदत केली होती. एवढेच नव्हे तर अहमदाबाद, सूरत, बंगळुरु, दिल्‍ली आणि हैदराबाद आदी ठिकाणी झालेल्या स्फोटात तरबेज सहभागी झाल्याचे पुढे येत आहे. आझमगढमधील एका डॉक्‍टरचा मुलगा तबरेज येथे फार्मासिस्‍टची परीक्षा देण्यासाठी गेला होता मात्र आज दहशतवादी बनला आहे.

आणखी फोटो पाहण्यासाठी पुढे क्लिक करा....

Next Article

Recommended